मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

महाराष्ट्रावर 'प्रभूकृपा' होणार का?

महाराष्ट्रावर 'प्रभूकृपा' होणार का?

नवी दिल्ली – 25 फेब्रुवारी : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आज (गुरूवारी) संसदेत अर्थसंकल्प मांडणार आहेत. सुरेश प्रभू दुसर्‍यांदा रेल्वे बजेट सादर करणार आहे. सकाळ-संध्याकाळ लोकलमध्ये होणारी प्रचंड गर्दी, असह्य झालेला प्रवास, गर्दीमुळे लोकलमधून पडून होणारे अपघात, प्रवास सुकर होण्यासाठी रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याची प्रवाशांची सातत्याने होणारी मागणी पाहता, मुंबई उपनगरीय लोकल प्रवाशांकडून यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पाकडेही मोठ्या आशेने पाहिलं जात आहे. त्यामुळे आज सादर होणार्‍या अर्थसंकल्पात रेल्वेमंत्री सुरेश 'प्रभू' मुंबईवर पावणार का, याकडे रेल्वे प्रवाशांचं लक्ष लागलं आहे.CbFfaPrUYAA2yVh

यंदाच्या अर्थसंकल्पात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अपंग प्रवाशांच्या सुविधांना प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. रेल्वेमध्ये महिलांच्या सुरक्षेकडे अधिक लक्ष देण्यात यावं, त्यासाठी स्थानके आणि रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. त्याचबरोबर रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारीही रेल्वेडब्यांमध्ये तैनात करण्यात यावेत, अशी मागणी अनेक महिलांनी केली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील प्रलंबित प्रकल्पांना चालना देण्यासाठी निधीची तरतूद होण्याचीही शक्यता आहे. गेल्या वर्षी सादर झालेल्या बजेटमध्ये एकाही नव्या गाडीची घोषणा झाली नव्हती. त्यामुळे यंदा मात्र, प्रीमियम गाड्यांची घोषणा होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी त्यांनी रेल्वेची आर्थिक स्थिती आणि पायाभूत सुविधा सुधारण्याकडे लक्ष दिले होतं. त्याचबरोबर, नव्या मार्गांसह मुंबईतील लोकल प्रवास सुखी आणि सुरक्षीत व्हावा, अशी अपेक्षा मुंबईकरांनी व्यक्त केली आहे. शिवाय राज्यात गेल्या काही वर्षांपासून अनेक मार्गांच्या मागण्या प्रलंबित आहेत. त्यामुळे यंदा तरी सुरेश प्रभू राज्यावर कृपा करतात का हे पाहावं लागेल आहे. तसंच, अर्थसंकल्पात ते कोणत्या नव्या गाड्यांची घोषणा करतात, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: #प्रभूएक्स्प्रेस, BJP, Rail budget, Suresh prabhu, Union budget, बजेट, बजेट2016

पुढील बातम्या