मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /रेल्वे बजेटमध्ये 'बुलेट ट्रेन'ची होणार घोषणा?

रेल्वे बजेटमध्ये 'बुलेट ट्रेन'ची होणार घोषणा?

    Gowda

    08 जुलै :  नरेंद्र मोदी सरकारचं पहिलं रेल्वे बजेट आज मांडलं जाणार आहे. रेल्वेमंत्री सदानंद गौडा हे बजेट मांडतील. या बजेटमध्ये सुरक्षा, अत्याधुनिक स्टेशन्स आणि हायस्पीड ट्रेन्स या मुद्द्यांवर भर असण्याची शक्यता आहे. त्याशिवाय बुलेट ट्रेनची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

    आम्हाला रेल्वे लोकाभिमुख करायची आहे, जनतेशी संवाद साधण्यासाठी आम्ही ट्विटर आणि फेसबुक अकाऊंट ओपन केली आहेत, रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी रेल्वे बजेट सादर करण्यापूर्वी दूरदर्शनशी बोलताना केलं स्पष्ट

    गेल्या महिन्यात, रेल्वे प्रवासी भाड्यात 14.2 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. त्यामुळे आता बजेटमध्ये कोणत्या सोयी सुविधा आणि नवीन गाड्यांची घोषणा होतेय याकडे जनतेचं लक्ष लागलंय. मुंबईकरांच्या आयुष्याचा भाग असणार्‍या लोकल ट्रेन्सच्या संख्येत वाढ आणि स्टेशन्सचं नूतनीकरणाबाबत घोषणा होतात का, याबद्दल उत्सुकता आहे.

    दरम्यान, रेल्वे बजेटच्या आधीच सरकारने केलेल्या भाडेवाढीमुळे नाराजी व्यक्त होतेय. पण रेल्वेची जी भाडेवाढ झाली ती आधीच्या सरकारमुळे झाली, या आधी रेल्वेचा कारभार पाहणारेच खरे गुन्हेगार आहेत, अशा शब्दांत अर्थमंत्री अरुण जेटलींनी काँग्रेसवर टीका केलीय.

    काय अपेक्षा आहेत, काय घोषणा होण्याची शक्यता आहे

    • रेल्वेला सध्या 26,000 कोटी रुपयांची गरज आहे, हे पाहता रेल्वेमंत्री फार मोठ्या घोषणा करणार नाहीत.
    • पॉप्युलिस्ट निर्णय न घेता, रेल्वेचा कारभार सुरळीत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न
    • इंधनासाठीचा वाढता खर्च पाहता सौरऊर्जा आणि बायो डिझेलच्या वापरासाठी प्रयत्न...
    • प्रकल्पांसाठी तरतूद
    • वर्ल्ड बँक, जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी, एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून भांडवल मिळवण्याचा प्रयत्न
    • पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा
    • थेट परकीय गुंतवणूक रेल्वे क्षेत्रात आणण्यासाठी FDI पॉलिसी जाहीर करण्याची शक्यता
    • सुरक्षित आणि वेगवान प्रवास आणि प्रवाशांचं संरक्षण यावर भर

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    [if0] [sc0]

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    First published:

    Tags: #livebudget, Budget news, Indian rail budget 2014, Indian train, Modi sarkar, Narendra modi, NDA, Parliamentary budget, Rail budget, Rail budget 2014, Rail minister, Rail minister sadananda gowda, Sadananda gowda, Train, अर्थसंकल्पीय अधिवेशन, बजेट, मोदी सरकार, रेल्वे बजेट, रेल्वेमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा