मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /रेकाॅर्डब्रेक कामगिरी, लातूरसाठी आता 25 लाख लीटर पाणी घेऊन 'वॉटर एक्स्प्रेस' निघणार !

रेकाॅर्डब्रेक कामगिरी, लातूरसाठी आता 25 लाख लीटर पाणी घेऊन 'वॉटर एक्स्प्रेस' निघणार !

    Train loading waterसांगली - 19 एप्रिल : मिरज रेल्वे यार्डात नवीन पाईपलाईनच्या मदतीने वॅगनमध्ये पाणी भरण्याचं काम सुरू आहे. 50 वॅगन पाण्याची रेल्वे लातूरकडे पाठवण्यात येणार आहे. आज संध्याकाळपर्यंत ही वॉटर एक्स्प्रेस पोहोचण्याची शक्यता आहे.

    दुष्काळग्रस्त भागात रेल्वेनं पाणी पुरवठा याआधी 1986 ला राजस्थान मधील अजमेर येथून भीलवाडा येथे करण्यात आला होता. यावेळी जवळपास 4 लाख लीटर पाणी रेल्वेनं पूरवलं गेलं होतं. हे अंतर जवळपास 170 किलोमीटर होतं. अशीच दुष्काळाची परिस्थिती आता मराठवाडा आणि विदर्भात झालीय. यासाठी सांगलीच्या मिरजहून लातूरला पाणी पुरवठा केला जातोय.

    एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा करण्याचा हा रेकॉर्ड झालाय. लातूरला मिरजहून 342 किलोमीटर रेल्वेनं पाणी नेण्याचा देशातील हा पहिला रेकॉर्ड झाला. आजपर्यंत लातूरला मिरजहून दहा-दहा वॅगन 9 टप्प्यात 45 लाख लीटर पाणी देण्यात आलंय. आज संध्याकाळपर्यंत 50 वॅगनमधून 25 लाख लीटर पाणी लातूरला रेल्वेनं देण्यात येणार आहे. आत्तापर्यंत 25 वॅगन भरले असून उर्वरित 25 वॅगन पाणी भरण्यात येतील.


    बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

    Follow @ibnlokmattv


    First published:
    top videos