08 जुलै : रुपयाची सुरू झालेली घसरण अजूनही सुरूच आहे. आजही रूपयाची घसरण होऊन डॉलरमागं 60 रुपये 95 अशी निचांकी पातळी गाठली. आज सकाळी झालेल्या व्यवहारांमध्ये रुपया शुक्रवारच्या तुलनेत तब्बल 72 पैशांनी घसरला. शुक्रवारी रुपया 60 रुपये 23 पैशांवर बंद झाला होता.
यापूर्वी रुपयाने 60 रुपये 76 इतका निचांक गाठला होता. अमेरिकेने रोजगार निर्मितीमध्ये अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी बजावल्याचा परिणाम रुपयावर झाल्याचं सांगण्यात येतंय. रोजगार निर्मितीमध्ये वाढ झाल्यामुळे अमेरिकी सरकार आपल्या नागरिकांना देत असलेल्या स्टिम्युलस पॅकेजमध्ये कपात करेल, परिणामी भारतात अमेरिकी रोख्यांची खरेदी वाढेल.
त्यामुळे परदेशी गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात अमेरिकी रोख्यांची विक्री करतील, आणि त्याचा परिणाम होऊन भारताची आर्थिक तूट वाढेल अशी भीती व्यक्त करण्यात येतेय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian rupess, डॉलर, रुपया