मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

राहुल गांधींना देशाची पुन्हा फाळणी हवी आहे का ?- अमित शहा

राहुल गांधींना देशाची पुन्हा फाळणी हवी आहे का ?- अमित शहा

amit_Shah_on_rahulनवी दिल्ली - 15 फेब्रुवारी : जेएनयू कॅम्पसमध्ये देशविरोधी कारवाया सुरू असूनही राहुल गांधी तिथं गेले. देशहित आणि देशविरोधी कारवायांमधला फरक राहुलना समजत नाही का ?, काँग्रेसनं देशप्रेमाची नवी व्याख्या केलीय, हे राहुलनी दाखवून दिलंय असून त्यांना पुन्हा फाळणी हवी आहे का? असा परखड सवाल भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी विचारलाय. जेएनयूच्या वादावर अमित शहांनी ब्लॉगवरून राहुल गांधींवर तोफ डागलीये. तसंच इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली होती, हे राहुल गांधी विसरले का? अशी आठवणही अमित शहांनी करुन दिली.

मोदी सरकारच्या यशस्वी कारभारामुळे काँग्रेसचे नेते गोंधळात सापडले आहे. काँग्रेसला आणि त्यांच्या नेत्यांना कोणती भूमिका मांडवी आणि कोणती मांडू नये अशी परिस्थिती निर्माण झालीये. जेएनयूमध्ये देशाविरोधात घोषणाबाजी करण्याचा प्रकार घडला. पण, राहुल गांधींना देशाभिमानाबद्दल काहीही घेणं देणं नाही असंच दिसतंय. त्यामुळे त्यांनी जेएनयूच्या विद्यार्थ्यांची भेट घेतली हे त्यावरून स्पष्ट होतंय अशी टीका अमित शहांनी आपल्या ब्लॉगमध्ये केली. तसंच अमित शहांनी राहुल गांधींना थेट सवाल केले आहे.

जेएनयू आंदोलनाला समर्थन देऊन राहुल गांधींनी फुटरतावाद्यांना प्रोत्साहन दिलंय का ?, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आड राहुल गांधींना देशाचे दोन तुकडे करायचे आहे का ?, देशविरोधी आंदोलनात तुम्ही सहभाग घेऊन देशद्रोही शक्तींना पाठिंबा देत आहात का ? आणि 1975 मध्ये आणीबाणी लागू कऱण्यात आली होती ही लोकशाहीसाठी बांधिलकी होती तर तेव्हा इंदिरा गांधींची मानसिकता ही हिटलरसारखी नव्हती का ? असे प्रश्नच अमित शहांनी राहुल गांधींना विचारले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: Abvp, JNU, Protest, Rahul gandhi, Rajnath singh, अभाविप, अमित शहा, राहुल गांधी

पुढील बातम्या