मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

राष्ट्रवादी काँग्रेसचं आज मराठवाड्यात जेलभरो आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेसचं आज मराठवाड्यात जेलभरो आंदोलन

NCP andolan

14 सप्टेंबर : शेतकर्‍यांचं कर्ज माफ करा आणि दुष्काळ जाहीर करा या मागण्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस आज (सोमवारी) संपूर्ण मराठवाड्यात जेलभरो आंदोलन करणार आहेत. मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन केलं जाणार आहे. गेल्या महिन्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उस्मानाबादमध्ये जाहीर सभा घेतली होती. त्यावेळी बोलताना त्यांनी 14 सप्टेंबरला जेलभरो आंदोलनाचा इशारा दिला होता.

यंदा मराठवाड्यात शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात आत्महत्या केल्यात. मराठवाड्यात सलग दुसर्‍या वर्षी दुष्काळ पडलाय. अनेक प्रकल्पांमध्ये तर वर्षभर पुरेल एवढाही पिण्याचं पाणीही शिल्लक नाही. त्यामुळे पाण्याचा प्रश्न भीषण झालाय. तसंच जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्नही गंभीर बनलाय. मात्र, सरकार पुरेशा गांभीर्यानं दुष्काळासाठी उपाययोजना करत नसल्याचा राष्ट्रवादीचा आरोप आहे. त्या निषेधार्थ आजचं जेलभरो आंदोलन पुकारण्यात आलंय. सकाळी 11 वाजता मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, लातूर, बीड, हिंगोली, उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे.राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे जालना जिल्ह्यातल्या आंबड तालुक्यातल्या वडगोधरीमध्ये जेलभरो करणार आहेत. तर धनंजय मुंडे परभणीत आंदोलन करणार आहेत. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आंदोलनात सहभाग घेणार नाहीत. अजित पवार आणि तटकरे सहभागी होणार नसल्यामुळे साहजिकच राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यानंतर राष्ट्रवादीने दोन्ही नेत्यांनी मुंबईतच राहून आंदोलनाचं समन्वय करणार असल्याचं स्प्ष्टीकरण दिलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Drought, Marathwada, NCP, राष्ट्रवादी काँग्रेस

पुढील बातम्या