Home /News /news /

राष्ट्रवादीला धक्का, उदय सामंत शिवसेनेत दाखल

राष्ट्रवादीला धक्का, उदय सामंत शिवसेनेत दाखल

uday samant in sena26 सप्टेंबर : एकीकडे युती आणि आघाडी संपुष्टात आली आहे. त्यामुळे निवडणुकीचे मैदान आता स्वबळासाठी मोकळे झाले आहे अशातच राष्ट्रवादीला कोकणात मोठा धक्का बसलाय.

राष्ट्रवादीचे नेते आणि नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत शिवसेनेत दाखल होणार आहे. इतकंच नाही तर उदय सामंत रत्नागिरी मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवणार आहे. उदय सामंत यांना उमेदवारी निश्चित झाली आहे.

उद्या उदय सामंत आपला अर्ज भरणार आहेत. उदय सामंत हे आज रत्नागिरीचे पालकमंत्रीही होते. ते आज राष्ट्रवादीकडे आपला राजीनामा पाठवणार आहेत.

उदय सामंत यांनी घेतलेला निर्णय दुदैर्वी व खेदजनक आहे. कोकणात राष्ट्रवादीची पाळमुळं खोलवर रुतलेली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कोकणातील सर्व जागा पूर्ण ताकदीनिशी लढवेल अशी खात्री राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: NCP, Ratnagiri, Shiv sena, उदय सामंत, कोकण, राष्ट्रवादी, शिवसेना

पुढील बातम्या