23 जून : राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार्या माजी आमदार मंदा म्हात्रे यांनी आज(सोमवारी) भाजपमध्ये प्रवेश केला.
भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी नेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत म्हात्रेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. 16 जून रोजी मंदा म्हात्रे यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
राज्याचे उत्पादनशुल्क मंत्री आणि नवी मुंबईचे आमदार गणेश नाईक यांच्या जाचाला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचं मंदा म्हात्रे यांनी जाहीर केलं होतं. त्यांनी आपला राजीनाम राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्याकडे सुपूर्द करुन पक्षाला रामराम ठोकला.
नाईक आणि म्हात्रे यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती. पण याबद्दल कुणीच काही बोलायला तयार नसल्यामुळे नाराज म्हात्रे यांनी पक्षत्याग करुन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. अखेर आज अपक्षेप्रमाणे म्हात्रे यांनी विधानसभेच्या वार्याचा वेध घेत भाजपमध्ये प्रवेश केलाय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ganesh naik, Manda mhatre, Navi mumbai