मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /'राष्ट्रवादीचं लग्नाला येऊ नको म्हटलं, तरी कोणत्या गाडीत बसू'

'राष्ट्रवादीचं लग्नाला येऊ नको म्हटलं, तरी कोणत्या गाडीत बसू'

  patangaro kadam on pawar20 ऑक्टोबर : राष्ट्रवादीची स्थिती म्हणजे, लग्नाला येऊ नको म्हटलं, तरी कोणत्या गाडीत बसू कशी आहे. भाजपाकडून मागणी होण्याच्या, अगोदरच राष्ट्रवादीकडून पाठिंबा जाहीर कसा ? असा खणखणीत टोला काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांनी शरद पवारांना लगावला. तर भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर येऊ नयेत, म्हणून राष्ट्रवादीनं घाईघाईत भाजपला पाठिंबा जाहीर केला असा आरोप युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम केला. सांगलीमध्ये कदम हे पत्रकारांशी बोलत होते.

  विधानसभेच्या प्रचारात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमनेसामने होती. प्रचार एकमेकांवर चिकलफेक करणारे नेते निकालानंतरही एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीये. भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर येऊ नयेत म्हणून राष्ट्रवादीने घाई गडबडीत भाजपला पाठिंबा दिलाय, असा आरोप युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष विश्वजीत कदम यांनी केलाय. तर त्यांचे वडील माजी मंत्री पतंगराव कदम यांनीही राष्ट्रवादीवर टीका केलीय. राष्ट्रवादीची स्थिती म्हणजे, लग्नाला येऊ नको म्हटलं, तरी कोणत्या गाडीत बसू अशी अवस्था आहे. भाजपाकडून मागणी होण्याच्या, अगोदरच राष्ट्रवादीकडून पाठिंबा जाहीर कसा ? असा खोचक सवाल पतंगराव कदम यांनी उपस्थित केला. तसंच काँग्रेसच्या नेत्यांच्यात समन्वय नव्हता, निरनिराळ्या कमिट्याचे नेते मुंबईत बसले होते, ते काय करत होते, त्याचं त्यानाच माहित, असे सांगून पतंगराव कदम पुढे म्हणाले, आजपर्यंत दिल्लीकडून आलेल्या मुख्यमंत्र्यांला साथ देण्याच काम मी केलं, मात्र आता स्पष्ट भूमिका घेण्याची वेळ आली आहे, आणि ती मी दिल्लीला जावून घेईन, असं ही पतंगराव कदम यांनी सांगितलं.

  +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

  [if0] Follow @ibnlokmattv[sc0]

  +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  First published:
  top videos