मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

राष्ट्रवादीचं 'जेलभरो', सुप्रिया सुळेंसह हजारो कार्यकर्ते ताब्यात

राष्ट्रवादीचं 'जेलभरो', सुप्रिया सुळेंसह हजारो कार्यकर्ते ताब्यात

sarweartay

14 सप्टेंबर : शेतकर्‍यांचं कर्ज माफ करा आणि दुष्काळ जाहीर करा या मागण्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस आज (सोमवारी) संपूर्ण मराठवाड्यात जेलभरो आंदोलन सुरू आहेत. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, लातूर, बीड, हिंगोली, उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला सकाळी 11 वाजता जालन्यापासून सुरुवात झाली. स्वत: सुप्रिया सुळे या आंदोलनाचं नेतृत्व करत असून काही वेळापूर्वी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. तर मुंबईतही सचिन अहिर, किरण पावस्कर आणि राहुल नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली जेलभरो आंदोलन सुरू आहे. पोलिसांनी त्यांच्यासह 250 ते 300 कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन काही वेळातच सोडून दिलं.

दरम्यान, शरद पवार आज दिल्लीत आहेत. ते दुश्काळाबद्दल पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. या आंदोलनाला सामोरं जाण्यासाठी मराठवाड्यातील प्रशासन सज्ज झालं असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ...म्हणून जेलभरो गेल्या महिन्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उस्मानाबादमध्ये जाहीर सभा घेतली होती. त्यावेळी बोलताना त्यांनी 14 सप्टेंबरला जेलभरो आंदोलनाचा इशारा दिला होता. यंदा मराठवाड्यात शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात आत्महत्या केल्यात. मराठवाड्यात सलग दुसर्‍या वर्षी दुष्काळ पडलाय. अनेक प्रकल्पांमध्ये तर वर्षभर पुरेल एवढाही पिण्याचं पाणीही शिल्लक नाही. त्यामुळे पाण्याचा प्रश्न भीषण झालाय. तसंच जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्नही गंभीर बनलाय. मात्र, सरकार गांभीर्यानं दुष्काळासाठी उपाययोजना करत नसल्याचा राष्ट्रवादीचा आरोप आहे. त्या निषेधार्थ आजचं जेलभरो आंदोलन पुकारण्यात आलंय. उस्मानाबादेत सर्वच महामार्गावर रास्ता रोको उस्मानाबादमध्येही राष्ट्रवादीच्या आंदोलनाला सुरूवात झाली आहे. उस्मानाबाद बायपास इथं पद्मसिंह पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली तर ढोकी रस्ता इथं आमदार राणा पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात येतंय. खरं तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरांना घेऊन जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. पण आंदोलकांनी गुरं न घेताच आंदोलन केलं. राष्ट्रवादीने एकूणच सगळ्या महामार्गांवर रास्ता रोको केलं आहे. नांदेड - नागपूर, नांदेड - पंढरपूर, नांदेड - हैदराबाद, नांदेड - अदिलाबाद आणि नांदेड-औरंगाबाद या रस्त्यांवर राष्ट्रवादीने आंदोलन केलं. या आंदोलनामुळे वाहतुकीची चांगलीच कोंडी झाली आहे. अजित पवार आणि सुनील तटकरे सहभागी नाही दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आंदोलनात सहभाग घेणार नाहीत. अजित पवार आणि तटकरे सहभागी होणार नसल्यामुळे साहजिकच राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यानंतर राष्ट्रवादीने दोन्ही नेत्यांनी मुंबईतच राहून आंदोलनाचं समन्वय करणार असल्याचं स्प्ष्टीकरण दिलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Drought, Marathwada, NCP, राष्ट्रवादी काँग्रेस

पुढील बातम्या