24 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी रावेर मतदारसंघात भाजपने विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे यांना तिकीट देण्यात आले आहे.
रावेर मतदारसंघाचे तिकीट अगोदर हरिभाऊ जावळे यांना दिलेलं होते ते आता रद्द करण्यात आलंय. त्यामुळे आता खडसे विरुद्ध जैन असा सामना रंगणार आहे.
हरिभाऊ जावळेंची उमेदवारी रद्द झाली असली तरी ते बंडखोरी करण्याची शक्यता कमी आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे मनीष जैन आणि भाजपकडून रक्षा खडसे असा दुरंगी सामना रंगणार असल्याचे चित्र आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Election, Election 2014, Raksha khadse, एकनाथ खडसे, रक्षा खडसे