मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

राज भेटीला मुंडे-गडकरी वादाची किनार !

राज भेटीला मुंडे-गडकरी वादाची किनार !

04 मार्च : महायुतीनं प्रचारात जोरदार आघाडी घेतली असताना भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरींनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेऊन नवा वाद निर्माण केलाय. या वादग्रस्त भेटीला मुंडे-गडकरी वादाची मोठी किनार आहे. कुठल्या न कुठल्या कारणानं मुंडे-गडकरी वाद कायम उफाळून येतो. उद्धव आणि मुंडेंच्या नेतृत्वाखाली महायुतीचा वारू जोरात असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरींनी नवी खेळी केलीये. आधी नाशिकमध्ये आणि आता मुंबईत नितीन गडकरींनी राज ठाकरेंची भेट घेतली. मला भेट घ्यायला कुणाची परवानगी लागत नाही, असं म्हणून त्यांनी मुंडे आणि महायुतीतल्या नेत्यांना टोमणा मारला. उद्धव आणि राज यांचं वैर ठाऊक असूनही गडकरींनी असं केल्यामुळे सेना-भाजप संबंध ताणले गेले आहेत. महाजनांच्या काळापासून मुंडेंचे शिवसेनेशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे शिवसेनेला गडकरींची आगळीक मंजूर नाही. खरं तर भक्कम अशी महायुती साकारण्याचं सर्व श्रेय गोपीनाथ मुंडेंना दिलं जातं. महायुतीच्या जागा वाटपात गोपीनाथ मुंडे यांचंच म्हणणं अंतिम राहिलंय. एवढंच नाही तर भाजपच्या उमेदवारांच्या यादीवरही मुंडेंचाच पगडा पहायला मिळालाय. राज्याच्या राजकारणात बाजूला पडलेल्या गडकरींनी राज ठाकरेंची भेट घेऊन मुंडेंना आपला हिसका दाखवलाय. आणि भाजपमधल्या याच जखमेवर राष्ट्रवादीने बोट ठेवलंय. येणार्‍या दिवसांमध्ये भाजपला चांगले आले, तरी गडकरी मुंडे वादही तितकाच चिघळणार, अशीच चिन्हं दिसत आहे.
First published:

Tags: BJP, MNS, Nitin gadkari, Raj and gadkari, Raj thakare news, Raj thakarey, गडकरी, नितीन गडकरी, बैठक, राज ठाकरे

पुढील बातम्या