मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /राज नकला करणारे नटरंग -विद्या चव्हाण

राज नकला करणारे नटरंग -विद्या चव्हाण

    24 ऑगस्ट : आमच्या बांगड्या देण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला.आम्ही बांगड्या घालतो म्हणजे आम्ही कमजोर नाहीत. तुम्ही जाहीर सभातून ज्या नकला करून दाखवता, तुम्ही नटरंग आहात का? अशी बोचरी टीका राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी केली.

    तसंच आम्ही सगळ्या महिला बांगड्या जरी घालत असलो म्हणजे आम्ही कमजोर नाहीत. या बांगड्यांचा आम्हाला अभिमान आहे. तुम्ही आम्हाला कमी लेखू नका. राज ठाकरेंनी जे विधान केलं ते अत्यंत चुकीचं आहे त्यांनी महिलांचा अपमान केलाय असंही विद्या चव्हाण म्हटलंय.

    मुंबईत छायाचित्रकार तरूणीवर बलात्कार प्रकरणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गृहमंत्री आर.आर.पाटील यांना बांगड्या पाठवा असं आवाहन केलं होते. राज यांच्या आदेशाप्रमाणे ताबडतोब मनसेच्या महिला पदाधिकार्‍यांनी बांगड्यांचा अहेर पाटील यांच्याकडे पाठवलाय. मात्र राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांनी आज राज ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन केलं. महिलाप्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं.

    First published:

    Tags: Photo, Photography, मनसे, मुंबई गँगरेप, राज ठाकरे, राष्ट्रवादी, विद्या चव्हाण, सामूहिक बलात्कार