04 सप्टेंबर : राज्यभरात पाऊस सरा'सरी' चांगलाच बरसलाय. राज्यात पाऊसपाण्याचा आणि पीक परिस्थितीचा आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. राज्यासाठी दिलाशाची गोष्ट म्हणजे बहुतांश धरणांमध्ये 70 टक्के पाणीसाठा झालाय. एकूण 74 टक्के पाऊस झालाय.
राज्यभरात पावसाने बहुतांश ठिकाणी बर्यापैकी हजेरी लावल्यामुळे सर्वच धरणातील पाणीसाठा 6 टक्क्यांनी वाढला असून आता तो 70 टक्के झाला आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यातील धरणांमध्ये देखील 8 टक्क्यांनी पाणीसाठा वाढला असून जायकवाडी धरण 27 टक्के भरले आहे. राज्यात 97 टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. राज्यातील पावसाची परिस्थिती पाहिली तर आतापर्यंत सरासरीच्या 74 टक्के पाऊस झाला आहे. नांदेड आणि चंद्रपूर या 2 जिल्ह्यांमध्ये 26 ते 50 टक्के पाऊस झालाय. रायगड, नाशिक, नंदूरबार, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ,
भंडारा, गोंदिया, गडचिरोली या 18 जिल्ह्यात 51 ते 75 टक्के पाऊस झालाय. रत्नागिरी, धुळे, सिंधुदुर्ग, जळगाव, अमरावती, वर्धा, नागपूर या 7 जिल्ह्यात 76 ते 100 टक्के इतका पाऊस पडलाय. तर ठाणे, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली या 6 जिल्ह्यात 100 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झालाय. मात्र राज्यातल्या 138 तालुक्यांमध्ये टंचाईसदृष्य परिस्थिती अजूनही कायम आहे. तिथे कृषी पंपांच्या चालू वीज बिलांमध्ये 33 टक्के सवलत, शालेय विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफी, शेतसारा माफी अशा सवलती देण्यात आल्या आहेत.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.