Home /News /news /

राज्यात अब की बार उद्धव ठाकरे सरकार !

राज्यात अब की बार उद्धव ठाकरे सरकार !

24 मे : लोकसभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळावल्यानंतर शिवसेना भाजपमध्ये येत्या काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण यावरुन वाद होण्याची चिन्हं आहे. दिल्लीमध्ये मोदी सरकार तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकार अशी पोस्टर्स शिवसेनेनं मुंबईत लावली आहे. सेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादर भागात ही पोस्टर्स लावण्यात आली आहे.

भाजपने विधानसभा निवडणूक कुणाच्या नेतृत्वाखाली लढणार या नावाची घोषणा करणार असल्याचं स्पष्ट केलं. मात्र नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा शपथविधी आणि केंद्रात सरकार स्थापनेनंतर हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या वाट्याला 23 जागा आल्यातर तर मोदी लाटेमुळे शिवसेनेलाही याचा फायदा सेनेलाही झाला. सेनेनं 18 ठिकाणी आपला भगवा फडकावला. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी भाजप दावा करणार असल्याचे स्पष्ट संकेत आहे. पण शिवसेनेच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे यासाठी मोर्चेबांधणीला सुरूवात केलीय.

राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरेच असतील, असा दावा मुंबईतले शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश देऊन त्यांच्याकडे महाराष्ट्राचं नेतृत्व सोपवण्याचा निर्णय घेतलाय, असंही खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे. सोबतच ज्यांची आमदार निवडून येण्याची शक्यता राहिली नाही, त्यांनी मुख्यमंत्री होण्याची स्वप्नं पाहू नये असा टोलाही त्यांनी मनसेला लगावला. भाजप-सेनेत मुख्यमंत्री पदावरुन वाद नाही, असं सांगायलाही शेवाळे विसरले नाहीत. आता याचा एक भाग म्हणून सेनेनंही पोस्टरबाजीने सुरुवात केलीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: BJP, Shiva sena, Udhav thakare, उद्धव ठाकरे, भाजप, मुख्यमंत्री, शिवसेना

पुढील बातम्या