30 मे : राज्यातून राज्यसभेसाठी भाजपकडून कुणाची नावं जाहीर होणार अखेर पडदा हटला असून भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय
सहस्त्रबुद्धे आणि नागपुरातील प्रसिद्ध नेत्रशल्यचिकीस्तक डॉ.विकास महात्मे यांना उमेदवारी जाहीर झालीये. भाजपकडून तशी अधिकृत घोषणा करण्यात आलीये.
येत्या 11 जूनला राज्यसभेसाठी महाराष्ट्रात निवडणूक होणार आहे. यासाठी काँग्रेसने कंबर कसली असून महाराष्ट्रातून माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना उमेदवारी जाहीर केलीये. तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी देण्यात आलीये. भाजप कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार याबद्दल सस्पेन्स निर्माण झाला होता. अखेर आज दोन नावांची घोषणा करण्यात आलीये. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलीये. 1 डॉ. विकास महात्मे अनपेक्षितपणे पुढं आलं आहे.
डॉ. विकास महात्मे हे नागपुरातील प्रसिद्ध नेत्रशल्यचिकीस्तक आहे. महात्मे हॉस्पिटलच्या माध्यमातून लाखो रुग्णांवर शस्त्रक्रिया केलीये. या सेवेसाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आलाय. तसंच महात्मे हे धनगर समाजाचे नेते आहे. आतापर्यंत अनेक आंदोलनात ते अग्रेसर राहिले आहे. महात्मे यांना उमेदवारी देऊन महादेव जानकरांना शह देण्याचा प्रयत्न भाजपने केलाय.
विनय सहस्त्रबुध्दे हे भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असल्यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे जवळपास निश्चित होतं. सहस्त्रबुद्धे हे भाजपच्या थिंक टँकमधली महत्वाची व्यक्ती आहे. राजकीय विश्लेषक म्हणून ते प्रसिद्ध आहे. तसंच तेरामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालकही आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
Follow @ibnlokmattv
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: डॉ.विकास महात्मे, भाजप, राज्यसभा