मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /राज्यसभेच्या जागेसाठी जोशींना सेनेचा पाठिंबा?

राज्यसभेच्या जागेसाठी जोशींना सेनेचा पाठिंबा?

    udhav on joshi03 डिसेंबर : राज्यातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी दोन महिन्यांत निवडणुका होणार आहेत. त्यासाठी आतापासून जोरदार जुळवाजुळव सुरू झाली आहे. राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी उत्सुक आहेत आणि त्यांना त्यासाठी पाठिंबा देण्याची शिवसेनेची तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

    त्यामुळे आठवलेंच्या सातव्या जागेच्या उमेदवारीचं काय हा प्रश्न उपस्थित झालाय. आठवलेंच्या जागेसाठी शिवसेना भाजपसोबत चर्चा करणार आहे अशीही माहिती मिळतेय.

    शिवसेनेकडे सातव्या जागेसाठी पुरेसं संख्याबळ नाही. या जागेसाठी मनसेची 11 मतं निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे जोशींना ही निवडणूक लढवायची असेल, तर मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. मागिल आठवड्यातच मनोहर जोशींनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन माफी मागितली होती.

    First published:

    Tags: Manhor joshi, Shiv sena, Shiv sena dasara melava, Udhav thakare, उद्धव ठाकरे, जोशी, जोशी सर, दसरा मेळावा, बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी, माफीनामा, शिवसेना