04 डिसेंबर : मी राज्यसभेची जागा लढवण्यासाठी उत्सुक आहे आणि माझ्या जवळचे पक्ष मला मतं देतील असा जाहीर दावा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशींनी केलाय. असं स्पष्ट करत जोशींनी आयबीएन लोकमतच्या बातमीला दुजोरा दिलाय. "राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी मनोहर जोशी उत्सुक आहेत आणि त्यांना त्यासाठी पाठिंबा देण्याची शिवसेनेची तयारी" असल्याची बातमी आयबीएन लोकमतने दिली होती त्याला खुद्द आता मनोहर जोशींनी दुजोरा दिलाय.
जे झालं त्यावर मी दिलगिरी व्यक्त केली. सर्वच कार्यकर्त्यांसोबत काम करायचं असतं. पण हा पक्ष आणखी मोठा व्हावा ही गरज आहे. उद्धव ठाकरे जे काही काम करत आहे त्यामुळे काही जण नाराज होतात. पण नाराजी पोटात घेऊन काम करायचं असतं असं मतही जोशींनी व्यक्त केलं. राज्यसभेच्या जागेबाबत आताच चर्चा सुरु नाही. गेल्या काही दिवसांपासून मी उद्धव यांच्याशी याबाबत चर्चा करत आलोय. त्यांची माझ्यावर नाराजी नाही असा दावाही जोशींनी व्यक्त केला.
तसंच जी जवळची पक्ष आहे ती मला मतं देतील मी जिंकून येणार नाही अशी कोणतीही भीती नाही परंतू हा निर्णय उद्धव यांचा आहे. जी कोणती जागा देण्यात येईल ती जिंकून दाखवले असा विश्वासही जोशींनी व्यक्त केला. दरम्यान, मनोहर जोशी यांनी आज भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यसभेची निवडणूक सातवा उमेदवार म्हणून लढवायची झाली, तर जोशींना भाजप, मनसे आणि अपक्ष यांच्या मतांची गरज आहे. हीच मतांची जुळवाजुळव करण्यासाठी जोशी मोदींना भेटल्याचं सूत्रांनी सांगितलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Manhor joshi, Shiv sena, Shiv sena dasara melava, Udhav thakare, उद्धव ठाकरे, जोशी, जोशी सर, मनोहर जोशी, माफीनामा, शिवसेना