मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

राज्यभरात गणरायाचं जल्लोषात स्वागत!

राज्यभरात गणरायाचं जल्लोषात स्वागत!

Ganpati in traffice

17 सप्टेंबर : सर्वांच्या लाडक्या सुखकर्ता, दु:खहर्ता गणपतीबाप्पाचं आज सगळीकडे आगमन होतंय, पुढचे आकरा दिवस राज्यभरात हा आंनंदोत्सव चालणार आहे. ढोल ताशांच्या गजरात, लेझीम पथक, डिजेच्या दणदणाटात अनेक मंडळांनी आपल्या बाप्पाचं स्वागत करत आहे. तर गणपती बाप्पा मोरया....मंगलमूर्ती मोरया..चा जयघोषात घरोघरी बाप्पाचं आगमन होतं आहे. भल्या पहाटेपासूनचं विविध मूर्तीशाळामधून लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी लोकांची एकच गर्दी झालीये.

कोकणात चाकरमान्यांनी आपला घरी वाजत गाजत गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ लोकमान्य टिळक यांनी पुण्यात रोवली. या पुण्यातला गणेशोत्सव हा विशेष असतो. पुण्यातील मानाच्या गणपतींचं मिरवणूक आणि प्रतिष्ठापना ही पुणेकरांसाठी महत्वाची असते.

मुंबईचा राजा मानल्या जाणार्‍या गणेश गल्ली मंडळाच्या मुर्तीची भक्तीभावाने प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी मुंबईच्या राजाचं पहिलं दर्शन घेण्यासाठी शेकडो भाविकांनी गर्दी केली होती.प्राणप्रतिष्ठेनंतर गणेश गल्लीच्या मुख्य मूर्तीचं मुखदर्शन करण्यात आलं. तर सिद्धिविनायकाच्या पहिल्या आरतीसाठीही मुंबईकरांनी गर्दी केली होती.

आपली विघ्नं दूर करणार्‍या विघ्नहर्त्याचं सगळीकडे जल्लोषात, उत्साहात स्वागत होतंय. आता आरत्यांनी, स्तोत्रांनी बाप्पाची स्तुती केली जाईल. दुर्वा, कमळ, केवडा, शमी या फुलापानांनी पूजा केली जाईल आणि मोदक, खिरापतच्या प्रसादानं बच्चेकंपनी खुश होईल. सगळी दु:ख दूर करणार्‍या आणि सगळीकडे मंगल करणार्‍या या बाप्पाकडे यंदा सगळ्यांची एकच प्रार्थना असणार आहे. बाप्पा राज्यावरचा हा दुष्काळ दूर कर, हे एकच साकडं सगळेजणं घालतायेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

[if0] Follow @ibnlokmattv[sc0]

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Pune ganpati, गणपती, गणपती बाप्पा