Home /News /news /

राजीव गांधी जीवनदायी योजनेचं नाव बदलू नका -चव्हाण

राजीव गांधी जीवनदायी योजनेचं नाव बदलू नका -चव्हाण

ashok chavan17 ऑक्टोबर : राजीव गांधी जीवनदायी योजनेचं नाव बदलून त्या योजनेला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्णय राज्य सरकार लवकरच घेण्याची शक्यता आहे. हे नाव बदलू नये अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलीय.

नाव बदलून राजकारण न करता ही योजना चांगली कशी राहील आणि लोकांपर्यंत कशी पोहोचेल याच्यावर सरकारने भर द्यायला हवा, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

जर नाव बदललं तर सरकारला विकासापेक्षा कुरघोडीच्या राजकारणात रस आहे असं समोर येईल, असंही चव्हाण यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Ashok chavan, अशोक चव्हाण, काँग्रेस, प्रदेशाध्यक्ष

पुढील बातम्या