मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

राजनच्या आरोपांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही -अहमद जावेद

राजनच्या आरोपांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही -अहमद जावेद

javed_ahamad_ips03 नोव्हेंबर : इंडोनेशियात अटक झालेला गँगस्टर छोटा राजन सीबीआयच्या ताब्यात आल्यानंतर त्याला मुंबईत आणण्याची प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी दिली. तसंच गँगस्टरच्या आरोपांवर उत्तर देण्याची गरज नाही असंही अहमद जावेद म्हणाले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

छोटा राजनच्या अटकेनंतर त्याला भारतात परत आणण्यासाठी हालचालींनी वेग आलाय. अशातच राजनने मुंबईतील पोलीस दलातील अधिकार्‍यांचे दाऊद इब्राहिमशी लागेबांधे आहे असा दावा केल्यामुळे खळबळ उडाली होती. मुंबईचे नव्याने नियुक्त झालेले पोलीस आयुक्त जावेद अहमद यांनी दुपारी पत्रकार परिषद घेऊन राजनचा दावा खोडून काढला. एखादा गुन्हेगार पोलिसांवर आरोप करत असेल तर ते गांभीर्याने घेण्यासारखं काही नाही. राजनने केलेल्या आरोपांवर उत्तर देण्याची मुळात गरजच नाही असं अहमद जावेद म्हणाले. तसंच भारतात आणल्यानंतर त्याला मुंबईत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. राजनसाठी आवश्यक ती सर्व सुरक्षा पुरवली जाणार असल्याचं जावेद यांनी स्पष्ट केलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Dawood ibrahim, गँगस्टर, छोटा शकील, दाऊद इब्राहिम

पुढील बातम्या