मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

राजकीय मैदानातही श्रीशांत तोंडावर आपटला, मतदारराजाने दाखवला घरचा रस्ता

राजकीय मैदानातही श्रीशांत तोंडावर आपटला, मतदारराजाने दाखवला घरचा रस्ता

केरळ - 19 मे : आयपीएलमध्ये मॅच फिक्सिंगमुळे तोंडावर आपटलेला एस श्रीशांत राजकीय आखाड्यातही चांगलाच तोंडावर आपटलाय. जनतेनं साफ नकार देत श्रीसंतला राजकारणात येण्याआधीच 'क्लिन बोल्ड' केलंय. तिरुवनंतपुरम मतदारासंघात श्रीसंत पराभूत झालाय.s sreesanth

क्रिकेटच्या मैदानावर वादमय इनिंग पेश करणारा एस श्रीशांत केरळ विधानसभेच्या आखाड्यात उतरला. तिरुवनंतपुरम मतदारसंघातून श्रीसंत भाजपच्या तिकीटावर आरोग्य मंत्री आणि काँग्रेसचे नेते वीएस शिवकुमार यांच्याविरोधात निवडणुकीला उतरला. वीएस कुमार याधीही याच जागेवरून निवडून आले होते. यावेळीही शिवकुमार यांनी आपला गड कायम राखला. आणि मतदाराजाने श्रीशांतला आपली जागा दाखवत तिसर्‍या स्थानावर फेकलं.

क्रिकेटची इनिंग संपल्यानंतर श्रीशांतने भाजपमध्ये प्रवेश करून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या प्रयत्नाची लोकांनी चांगलीच टिंगल उडवली. 2003 मध्ये आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात श्रीशांतवर आरोप झाले होते. दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली होती. पण सबळ पुराव्याअभावी त्याची सुटका झाली. पण, बीसीसीआयने श्रीशांतवर आजीवन बंदी आणलीये.

एवढंच नाहीतर 2008 मध्ये आयपीएलच्या एका सामन्यात हरभजन सिंगने श्रीशांतच्या श्रीमुखात भडकावली होती. मीडियासमोर श्रीशांत ढसाढसा रडतांना दिसला होता. पण, इथंही त्याने पलटी मारली आणि हरभजनने आपल्या श्रीमुखात भडकावली नाही, तो तर माझा भाऊ आहे अशी सारवासारव केली होती. वादग्रस्त आयुष्य जगलेल्या श्रीशांतला राजकीय मैदानातही समजादार मतदाराजाने घरचा रस्ता दाखवलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Follow @ibnlokmattv


First published:

Tags: BJP, Kerala, S sreesanth, केरळ निवडणूक, श्रीशांत