मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

रत्नागिरी जिल्ह्यात वणव्यामुळे 500 एकर वनक्षेत्र जळून खाक

रत्नागिरी जिल्ह्यात वणव्यामुळे 500 एकर वनक्षेत्र जळून खाक

Ratnagiri vanava 16 फेब्रुवारी :  रत्नागिरी जिल्ह्यात वणवा पेटल्यामुळे 500 एकर वनक्षेत्र जळून खाक झालंय. खेडजवळच्या दाभिळ, सात्विनगाव आणि बोरज या तीन गावांच्या वनक्षेत्रात बुधवारी मध्यरात्री हा वणवा लागला. अचानकपणे वणवा पेटल्याने ग्रामस्थांचीही धावपळ झाली. या गावांमधली आंबा, काजूची कलमं जळून खाक झाल्यामुळे बागायतदार आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. मोहोर आलेली आंबा आणि काजूची झाडं जळून गेल्यामुळे गावकऱ्यांच्या हातचं पीक गेलंय.  वनविभागाच्या पथकाने गावकऱ्यांच्या मदतीने हा वणवा आता आटोक्यात आणलाय. ही आग लागली की लावली याबद्दल वनविभाग तपास करतंय. जमिनीची भाजावळ करताना ही आग लावली असावी, असा अंदाज आहे. वणव्यामुळे आंबा आणि काजू बागायदारांचं नुकसान झालंय. या आगीची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केलीय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: Ratnagiri, रत्नागिरी

पुढील बातम्या