मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

रत्नागिरीत अवतरला 'मांझी', बांधल्या अनेक झोपड्या !

रत्नागिरीत अवतरला 'मांझी', बांधल्या अनेक झोपड्या !

रत्नागिरी - 20 जानेवारी : मागील वर्षी सत्य घटनेवर आधारीत रिलीज झालेल्या 'मांझी द माऊंटन मॅन' सारखीच घटना रत्नागिरीत घडली असून डोंगर गावच्या माळावर असाच एक 'मांझी' अवतरलाय. गेल्या काही वर्षांपासून त्यानं एकच ध्यास घेतलाय. एकापाठोपाठ एक झोपड्या बांधण्याचा...त्यानं अशा जवळपास पन्नास झोपड्या बाधल्यात. पण गंमत म्हणजे या झोपड्यात राहत मात्र कुणीच नाही.ratnagir_manjhi

दगड, बांबू, गवत पानं आणि वेलींचा वापर त्यानं झोपड्या बांधण्यासाठी केलाय. या झोपड्या अतिशय मजबूत आणि इकोफ्रेंडलीही आहेत. बाहेर कितीही उष्णता असली तरी या झोपड्यांमध्ये मात्र अगदी एसीत बसल्यासारखं गारेगार वाटतं. पण या झोपड्या बांधण्याचा उद्देश काय, हे मात्र तो माणूस सांगत नाही. या अवलियाचं नाव आहे सीताराम जोगले... या झोपड्या हा माणूस का बांधतोय ते ही सांगत नाही.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Ratnagiri

पुढील बातम्या