Home /News /news /

रतन टाटा यांचा झंझावात

रतन टाटा यांचा झंझावात

अजय कौटिकरावर, मुंबई28 डिसेंबरप्रख्यात उद्योगपती रतन टाटा आज निवृत्त होतायत. 50 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सायरस मिस्त्री यांच्याकडे आता टाटा समूहाची धुरा जाणार आहे. दिडशे वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेल्या टाटा समुहाला नव्या उंचीवर नेणारे रतन टाटा हे पाचवे शिलेदार होते.. आजच्या निवृत्तीच्या दिवशी त्यांच्या कारकिर्दीवर टाकलेला हा प्रकाशझोत... रतन नवल टाटा.... जगभरातल्या उद्योगविश्वात अत्यंत आदरानं घेतलं जाणारं नाव. भारतातल्या सर्वात मोठ्या उद्योगसमुहाचे प्रमुख...आकाशाला गवसणी घालताना, जमिनीवर घट्ट पाय असलेला सह्रदयी माणूस...एखादा उद्योगपती निवृत्त होत असताना जगभरात त्या घटनेची दखल घेतली जावी हे अपवादानेच घडते, मात्र रतन टाटा याला अपवाद आहेत. उद्योग वाढवत असताना ` विश्वस्त` ही भावना मनात ठेवून काम करणार्‍या मुल्यांमुळेच टाटांना हा आदर मिळाला. अमेरिकेतल्या कॉर्नेल विद्यपीठातून इंजिनियरिंगची आणि हॉर्वडमधून एमबीएची पदवी घेतल्यानंतर 1962 मध्ये रतन टाटा `टाटा` उद्योगसमुहात रूजू झाले. टाटांच्या शिस्ती प्रमाणं सुरवातीला त्यांनी जमशेदपूरच्या टाटा स्टील कंपनीत उमेदवारीला सुरूवात केली ती एक सामान्य कर्मचारी म्हणून..माणसं पारखण्यात तरबेज असलेल्या जेआरडींनी त्यांच्यातले गुण ओळखून त्यांना स्वतंत्र जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आणि खर्‍या अर्थानं रतन टाटांच्या कारकिर्दीला सुरवात झाली.सुरवातीला `नेल्को` आणि `एम्प्रेस` मीलची जबाबदारी सांभाळताना त्यांच्या पदरी अपयश आलं. जेआरडींनी मात्र त्यांची भक्कम पाठराखण केली. आणि रतन टाटा हेच जेआरडींचे वारस असल्याचं स्पष्ट झालं.त्यानंतर सुरू झालेली यशाची मालिका आणि नवे विक्रम अजूनही सुरूच आहेत. कोरस, जग्वार, टेटली सारख्या जगातल्या नामांकित कंपन्या टाटांनी खरेदी केल्या. या भरारीनं देशातल्या तरूणांना नवी ऊर्जा दिली.` मोठी स्वप्न पाहाणं आणि ती प्रत्यक्षात आणणं ` हा रतन टाटांचा स्वभाव. याच स्वप्नांमधून इंडिगो आणि नॅनो ची निर्मिती झाली आणि कुठलीच गोष्ट अशक्य नााही हे टाटांनी सिध्द केलं.हे यश मिळवत असतांना टाटांनी कधीच आपल्या मुल्यांशी तडजोड केली नाही. यामुळंच सचोटी, गुणवत्ता म्हणजे टाटा हे समिकरण तयार झालंय.आधीच ठरवल्याप्रमाणं रतन टाटा वयाच्या 75 व्या वर्षी निवृत्त होतायत. तरूण असलेल्या सायरस मिस्त्री यांच्याकडे आता टाटा समुहाची धुरा जाणार आहे. यापुढं काम करताना.. 'मागचं कुठलही ओझं न बाळग तु तुझ्या पध्दतीनं निर्णय घे' असा सल्ला रतन टाटांनी सायरस यांना दिला. कारण हाच वारसा जेआरडींनी त्यांना दिला होता.

पुढे वाचा ...

अजय कौटिकरावर, मुंबई28 डिसेंबर

प्रख्यात उद्योगपती रतन टाटा आज निवृत्त होतायत. 50 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सायरस मिस्त्री यांच्याकडे आता टाटा समूहाची धुरा जाणार आहे. दिडशे वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेल्या टाटा समुहाला नव्या उंचीवर नेणारे रतन टाटा हे पाचवे शिलेदार होते.. आजच्या निवृत्तीच्या दिवशी त्यांच्या कारकिर्दीवर टाकलेला हा प्रकाशझोत... रतन नवल टाटा.... जगभरातल्या उद्योगविश्वात अत्यंत आदरानं घेतलं जाणारं नाव. भारतातल्या सर्वात मोठ्या उद्योगसमुहाचे प्रमुख...आकाशाला गवसणी घालताना, जमिनीवर घट्ट पाय असलेला सह्रदयी माणूस...

एखादा उद्योगपती निवृत्त होत असताना जगभरात त्या घटनेची दखल घेतली जावी हे अपवादानेच घडते, मात्र रतन टाटा याला अपवाद आहेत. उद्योग वाढवत असताना ` विश्वस्त` ही भावना मनात ठेवून काम करणार्‍या मुल्यांमुळेच टाटांना हा आदर मिळाला. अमेरिकेतल्या कॉर्नेल विद्यपीठातून इंजिनियरिंगची आणि हॉर्वडमधून एमबीएची पदवी घेतल्यानंतर 1962 मध्ये रतन टाटा `टाटा` उद्योगसमुहात रूजू झाले.

टाटांच्या शिस्ती प्रमाणं सुरवातीला त्यांनी जमशेदपूरच्या टाटा स्टील कंपनीत उमेदवारीला सुरूवात केली ती एक सामान्य कर्मचारी म्हणून..माणसं पारखण्यात तरबेज असलेल्या जेआरडींनी त्यांच्यातले गुण ओळखून त्यांना स्वतंत्र जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आणि खर्‍या अर्थानं रतन टाटांच्या कारकिर्दीला सुरवात झाली.सुरवातीला `नेल्को` आणि `एम्प्रेस` मीलची जबाबदारी सांभाळताना त्यांच्या पदरी अपयश आलं. जेआरडींनी मात्र त्यांची भक्कम पाठराखण केली. आणि रतन टाटा हेच जेआरडींचे वारस असल्याचं स्पष्ट झालं.त्यानंतर सुरू झालेली यशाची मालिका आणि नवे विक्रम अजूनही सुरूच आहेत. कोरस, जग्वार, टेटली सारख्या जगातल्या नामांकित कंपन्या टाटांनी खरेदी केल्या. या भरारीनं देशातल्या तरूणांना नवी ऊर्जा दिली.` मोठी स्वप्न पाहाणं आणि ती प्रत्यक्षात आणणं ` हा रतन टाटांचा स्वभाव. याच स्वप्नांमधून इंडिगो आणि नॅनो ची निर्मिती झाली आणि कुठलीच गोष्ट अशक्य नााही हे टाटांनी सिध्द केलं.

हे यश मिळवत असतांना टाटांनी कधीच आपल्या मुल्यांशी तडजोड केली नाही. यामुळंच सचोटी, गुणवत्ता म्हणजे टाटा हे समिकरण तयार झालंय.आधीच ठरवल्याप्रमाणं रतन टाटा वयाच्या 75 व्या वर्षी निवृत्त होतायत. तरूण असलेल्या सायरस मिस्त्री यांच्याकडे आता टाटा समुहाची धुरा जाणार आहे. यापुढं काम करताना.. 'मागचं कुठलही ओझं न बाळग तु तुझ्या पध्दतीनं निर्णय घे' असा सल्ला रतन टाटांनी सायरस यांना दिला. कारण हाच वारसा जेआरडींनी त्यांना दिला होता.

First published:

पुढील बातम्या