05 सप्टेंबर : रघुराम राजन यांनी आरबीआयचे गव्हर्नर म्हणून सूत्र हाती घेतल्यानंतर आज दुसर्यांच दिवशी शेअर बाजारात उत्साहाच वातावरण पसरलंय. रुपयाची स्थिती सावरण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं केलेल्या उपायांमुळे रुपया डॉलरमागे तब्बल 138 पैशांनी वधारला.
बाजार सुरू झाल्यानंतर रुपयाचा भाव डॉलरमागे 65 रुपये 69 पैसे इतका आहे. बुधवारी तो 67 रुपये 07 पैशांवर होता. रघुराम राजन यांनी बुधवारी आरबीआयचे गव्हर्नर म्हणून सूत्र हाती घेतली.
त्यावेळी त्यांनी बँकिंग सेक्टरबाबत केलेल्या सकारात्मक घोषणांचा हा परिणाम असल्याचं मानलं जातंय. शेअर बाजारातही उत्साह आहे. सेन्सेक्स 500 अंकांनी वधारला, तर निफ्टीमध्येही सुधारणा झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.