18 सप्टेंबर : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. वाय. येडियुरप्पा हे पुन्हा एकदा भाजपमध्ये परतण्याचे प्रयत्न करत असल्याचं दिसतंय. पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना आपण पाठिंबा देऊ, असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, येडियुरप्पा यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते अरूण जेटली यांची भेट घेण्यासाठी आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांना पाठवलंय.
कर्नाटक जनता पक्षाचं भाजपमध्ये विलिनीकरणासाठी भाजपमध्ये मतैक्य घडवून आणण्यासाठी ते चर्चा करणार आहेत. नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर येडियुरप्पा यांनी भाजपमध्ये परतण्याची इच्छा व्यक्त केलीये.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.