मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

या आहेत राज्याच्या प्रभूंकडून अपेक्षा

या आहेत राज्याच्या प्रभूंकडून अपेक्षा

prabhu_maharashtra25 फेब्रुवारी : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आज आपलं दुसरं रेल्वे बजेट सादर करणार आहे. सुरेश प्रभू हे महाराष्ट्राला लाभलेले रेल्वेमंत्री आहे. त्यामुळे साहजिकच आपल्या 'घरच्यांना' सुरेश प्रभू काय झुकतं माप देता हे पाहण्याचं ठरणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर, कोकण, खान्देश आणि विदर्भातील लोकांच्या बजेटकडून खास अपेक्षा आहे. राज्याच्या प्रभूंकडून अपेक्षा - पुणे-दौंड लोकल सेवा सुरू करा - पुणे-लोणावळा लोकल फेर्‍या वाढवा - पुणे रेल्वे स्थानकाचं नूतनीकरण करा - नगर-पुणे थेट रेल्वे सेवा सुरू करा - पंढरपूर-तुळजापूर रेल्वेची घोषणा - सोलापूर स्थानकात मालधक्का बांधा - नगर-परळी लोहमार्गासाठी अधिक निधी द्या - नागपूर-पुणे गरीबरथची सेवा दररोज करा - नागपूरला रेल्वे आरक्षणात कोटा वाढवून द्या - यवतमाळ-नांदेड रेल्वेचं काम सुरू करा - मनमाड-नांदेड ट्रॅकचं दुपदरीकरण करा - मुंबई-औरंगाबाद गाड्या वाढवा कोकणाला प्रभूंकडून काय हवं? - कोकण रेल्वेला भारतीय रेल्वेत समाविष्ट करा - कोकण रेल्वेचं दुपदरीकरण करा - तिकीटावरचा अधिभार काढा - चिपळूण-कराड रेल्वेला मंजुरी द्या - विलवडे-कोल्हापूर रेल्वेची जुनी मागणी पूर्ण करा मुंबईकरांना सुरेश प्रभूंकडून कोणत्या अपेक्षा आहेत ? - प्रवाशांच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करा - 15 डब्यांच्या लोकल वाढवा - स्थानकांवर शौचालयांची संख्या वाढवा - सरकत्या जीन्यांची संख्या वाढवा - हार्बर लाईनच्या चौपदरीकरणाबाबत निर्णय घ्या - कुर्ला-सीएसटीदरम्यान 5 व्या आणि 6 व्या लाईनचं काम सुरू करा - एसी लोकल नेमकी कधी सुरू होणार ते सांगा  
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: BJP, Union budget, कोकण, नाशिक, पुणे, महाराष्ट्र, मुंबई, सोलापूर

पुढील बातम्या