Home /News /news /

... म्हणून रवींद्र गायकवाड भडकले, एअर इंडियाच्या हवाईसुंदरीने मांडली गायकवाडांची बाजू

... म्हणून रवींद्र गायकवाड भडकले, एअर इंडियाच्या हवाईसुंदरीने मांडली गायकवाडांची बाजू

airhostess_gaikwad27 मार्च : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केल्यामुळे चर्चेत आलेले शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत असताना या प्रकरणात एक ट्विस्ट आलं आहे. एअर इंडियाच्याच एका एअर होस्टेसने आपली प्रतिक्रिया देत रवींद्र गायकवाड यांच समर्थन केलं आहे.

शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी केवळ एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याने केलेल्या गैरवर्तणुकीवर प्रतिक्रिया दिली असं वक्त्यव्य एअर इंडियाच्या एअर होस्टेसने केलं आहे. रवींद्र गायकवाड हे अतिशय शांतपणे बोलत होते. एअर इंडियाचे कर्मचारी शिवकुमार यांना मारण्याचा किंवा त्यांना विमानाच्या शिडीवरुन ढकलून देण्याचा रवींद्र गायकवाड यांचा विचार नव्हता असंही या एअर होस्टेसने म्हटलं आहे. ही हवाईसुंदरी त्या वेळी विमानावरच उपस्थित होती.

या एअर होस्टेसने आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे की, रवींद्र गायकवाड हे अतिशय सभ्यपणे सर्वांशी बोलत होते. गायकवाड यांना बोर्डिंग पासवर जे क्लासचे सीट मिळालं होतं पण बसताना त्यांना इकोनॉमी क्लासची जागा मिळाली होती. याप्रकरणीत्यांना एअर इंडियाच्या वरिष्ठांशी बोलायचं होतं पण त्यांच्याशी कोणीच वरिष्ठ बोलायला आलं नाही . त्यानंतर शिवकुमार आले आणि ते बोलू लागले. शिवकुमार आपले काम प्रामाणिकपणे करत होते परंतु अचानकपणे ते काही चुकीचे बोलले गेले आणि गायकवाड भडकले यानंतर दोघांमध्ये वाद झाला. मग, गायकवाड यांनी आपली चपल काढली आणि त्यांना ते मारणार होते तेवढ्यात मी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पुणे ते दिल्ली प्रवासादरम्यान रवींद्र गायकवाड यांचा एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यासोबत वाद झाला आणि त्यानंतर त्यांनी त्या कर्मचाऱ्याला सँडलने मारहाण केली. या प्रकरणामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. या प्रकरणी गायकवाड यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आली आहे तर गायकवाड यांनीही त्या कर्मचाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या घटनेनंतर एअर इंडियासह इतरही विमान कंपन्यांनी गायकवाड यांना विमानसेवा देण्यास नकार दिला. त्यामुळे गायकवाड यांनी दिल्लीहून महाराष्ट्रात ट्रेनने परतावे लागलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


First published:

Tags: Air india, Shivsena, रवींद्र गायकवाड, शिवसेना

पुढील बातम्या