Home /News /news /

...म्हणून मोदींवर टीका केली -राज ठाकरे

...म्हणून मोदींवर टीका केली -राज ठाकरे

13 ऑक्टोबर :: आजच्या एकूण राजकारणात बघायला गेले तर आज देशाचा जो बट्याबोळ झालाय त्यात पंतप्रधान म्हणून शेवटची आशा आहे. त्यांनी पंतप्रधान झाल्यावर भूमिका बदलायला पाहिजे होती पण ते बदलले नाही म्हणून मी माझी भूमिका बदली अशी स्पष्टोक्ती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. तसंच राज्यात स्वायत्तता असली पाहिजे असंही ते म्हणाले. आज मुंबईत पत्रकारांशी ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदींना पाठिंबा देत मतांचा जोगवा मागणारे राज ठाकरे सर्वांनी पाहिले पण विधानसभेच्या निवडणुकीत वेगळं चित्र पाहण्यास मिळालं. राज ठाकरे यांनी थेट मोदींवर निशाणा साधत सडकून टीका केली. 'पंतप्रधान देशाचे की गुजरातचे ?' असा जाहीर सभेत प्रश्न विचारून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असलेलं प्रेम आटलं असल्याचं स्पष्ट केलं.पण आज प्रचार तोफ थंडावण्याच्या अगोदर मुंबईत राज ठाकरेंनी पत्रकारांशी वार्तालाप केला. यावेळी त्यांनी मोदींवर का टीका केली याचा खुलासाच केला. मोदी पंतप्रधान झाले पण ते गुजरातमधून बाहेर पडलेच नाही. गुजरातचे पंतप्रधान अशी ओळखच मोदींची झालीये. ते स्वत: गुजरातच्या विकासाचे गुण गात आहे. त्यांनी पंतप्रधान झाल्यावर भूमिका बदलायला पाहिजे होती पण ते बदलले नाही त्यामुळे मला टीका करावी लागली अशी पुस्ती राज यांनी जोडली. तसंच आजच्या एकूण राजकारणात बघायला गेलं तर आज देशाचा जो बट्याबोळ झालाय त्यात पंतप्रधान म्हणून शेवटची आशा आहे असंही राज म्हणाले. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: MNS, Raj thackarey, मनसे, राज ठाकरे

पुढील बातम्या