27 जून : पंढरपूरहून सोलापूरच्या दिशेने निघालेल्या भाविकांचा मोहोळजवळ टाटा सुमो आणि ट्रकचा समोरासमोर धडक झालीये. या अपघातात 3 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाले आहे.
या अपघातात वाहनचालक लक्ष्मण सुरेश पाटील, छाया शिवाजी पाटील, सुजाता डवर या तिघांचा जागीच मृत्यू झालाय.
हे सर्व भाविक कोल्हापुरातील कंतेवाडी गावचे राहणारे आहेत. पहाटेच्या सुमारास विठ्ठलाचे दर्शन घेऊन सोलापूर मार्गे अक्कलकोट आणि तुळजापुरला देव दर्शनासाठी जात असताना मोहोळजवळील तांबोळी फाट्याजवळ टाटा सुमो आणि ट्रकचा समोरासमोर जोरदार धडक झाली.
ही धडक एवढी भीषण होती या अपघाता सुमोचा चुराडा झाला. जखमींना सोलापूरच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलंय.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.