मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

मोदी सरकारची कसोटी, 28 फेब्रुवारीला अर्थसंकल्प होणार सादर

मोदी सरकारची कसोटी, 28 फेब्रुवारीला अर्थसंकल्प होणार सादर

modi and jetlyq21 जानेवारी : 'अच्छे दिन...' असं आश्वासन देणार्‍या मोदी सरकारची 23 फेब्रुवारीपासून कसोटी लागणार आहे. संसदेचं बजेट अधिवेशन 23 फेब्रुवारी ते 20 मार्च दरम्यान होणार आहे. त्यानंतर थोड्या विश्रांतीनंतर पुन्हा 20 एप्रिलपासून ते 8 मेपर्यंत अधिवेशनाला सुरुवात होईल. तर 28 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प तर 26 ला रेल्वे अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

मोदी सरकार सत्तेवर विराजमान झाल्यानंतर पहिला वहिला केंद्रीय अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प सादर केला होता. आता मात्र, सरकारच सुरळीत रुळले असून चालू वर्ष 2015-16 साठी संसदीय अधिवेशनाला सामोरं जाणार आहे. दरम्यान, ज्या पद्धतीने अध्यादेश संमत केले जातात त्यावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर आता सरकार हे सर्व अध्यादेश विधेयकाच्या रुपात या बजेट अधिवेशनात मांडणार असल्याचं कळतंय. राज्यसभेत सरकारचं बहुमत नाही त्यामुळे जर राज्यसभेत ही विधेयक संमत झाली नाही तर संयुक्त संसदीय अधिवेशन बोलावण्याचा सरकार विचार करतंय अशीही माहिती मिळतेय. विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक किंवा कोळसा खाणींचा ऑनलाईन लिलाव यासंदर्भात आणि असे 8 अध्यादेश आत्तापर्यंत सरकारनं काढले आहे. ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Union budget, संसद

पुढील बातम्या