07 जुलै : लोकसभा निवडणुकीत बहुमताने सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारची खरी कसोटी आजपासून सुरू होणार्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लागणार आहे. नव्या सरकारचा पहिला रेल्वे अर्थसंकल्प 8 जुलैला तर केंद्रीय अर्थसंकल्प 10 जुलै रोजी मांडला जाणार आहे. मोदी सरकारचं हे पहिलंवहिलं बजेट असल्यामुळे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हा अर्थसंकल्प मांडतील तर रेल्वेमंत्री सदानंद गौडा हे रेल्वे बजेट मांडतील. तब्बल महिनाभर म्हणजेच 14 ऑगस्टपर्यंत चालणार्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस महागाई, इंधन दरवाढ आणि रेल्वे भाडेवाढ या विषयांवरून मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करेल. मध्य प्रदेशातला मेडिकल कॉलेज घोटाळाही काँग्रेस लावून धरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर गृहमंत्री राजनाथ सिंह आंध्र प्रदेश पुनर्स्थापना सुधारणा विधेयक मांडतील. इराकमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या परिस्थितीवरही सरकार या अधिवेशनात निवेदन सादर करू शकते.
महागाईविरोधात केंद्र सरकारची रणनीती
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Business, Finance, NDA, Parliamentary budget, Politics, अर्थसंकल्प, पहिल्या बजेट, मोदी सरकार, रेल्वे बजेट, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात