मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /मोदींनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाचं शिवसेनेला आमंत्रण नाही

मोदींनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाचं शिवसेनेला आमंत्रण नाही

    narendra modi meet udhav thakare23 ऑक्टोबर : विधानसभेत घवघवीत यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या सर्व विजयी शिलेदारांसाठी स्नेहभोजनाचा आयोजन केलं आहे. पण या स्नेहभोजनाचं शिवसेनेला अजूनही आमंत्रण नाही. एनडीएतील इतर घटकपक्षांना निमंत्रण देण्यात आलंय पण शिवसेनेला निमंत्रण येणार का याबद्दल उत्सुकता आहे.

    26 तारखेला होणार्‍या पंतप्रधानांच्या स्नेहभोजनाचं निमंत्रण शिवसेनेच्या खासदारांना देण्यात आलेलं नाही. एनडीएतल्या इतर मित्रपक्षांना निमंत्रणं देण्यात आली आहेत. राज्यातल्या सरकार स्थापनेला खर्‍या अर्थाने 26 तारखेनंतरच सुरुवात होणार असल्यानं या स्नेहभोजनाला महत्व प्राप्त झालंय. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते सुभाष देसाई आणि अनिल देसाई यांचनी दोनच दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन भाजप नेत्यांची भेट घेतली होती. शिवसेनेचा बिनशर्त पाठिंबा असले असा निरोप देसाई यांनी दिला होता. सोमवारनंतर सरकार स्थापनेबाबत चर्चा सुरू होईल असं देसाई यांनी स्पष्ट केलं होतं. पण आता 26 तारखेला पंतप्रधानांनी स्नेहभोजनाचं आयोजन केलंय. त्यामुळे शिवसेनेच्या खासदारांना निमंत्रण मिळणार का? या स्नेहभोजनला सेनेचे खासदार जाणार का ? हे पाहण्याचं ठरणार आहे.

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    [if0] Follow @ibnlokmattv[sc0]

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    First published:

    Tags: NDA, Shiv sena