29 एप्रिल : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनीही आता नरेंद्र मोदींवर जोरदार तोफ डागली आहे. 'तृणमूल काँग्रेसनं मोदींना कसाई म्हटलं होतं, पण कसाईसुद्धा मोदींना पाहून लाजेल' अशी विखारी टीकालालू प्रसाद यांनी केली आहे. बिहारमध्ये उद्या होणार्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रीय जनता दलामध्ये वाद पेटला चांगलाचं आहे. असा माणूस देशाचा पंतप्रधान होणार का असा सवालही त्यांनी केला आहे.
तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या शारदा चिट फंड घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी प. बंगालमधल्या श्रीरामपूर इथल्या सभेत बोलताना केला होता. तर मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर देत तृणमूल कॉंग्रेस पक्षाने मोदी हे खाटीक असल्याचा असल्याची टीका केली होती. त्यामुळे ऐन निवडणूकीच्या तोंडावर या शाब्दिक युद्धला चांगलाचं रंग चढू लागला .
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: West bengal