मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /मोदींच्या शपथविधीसाठी 'सार्क'ला निमंत्रण?

मोदींच्या शपथविधीसाठी 'सार्क'ला निमंत्रण?

    saarc modi21 मे :  नरेंद्र मोदी सोमवारी पंतप्रधानपदी विराजमान होणार असून, या शपविधीसाठी 'सार्क'च्या राष्ट्रप्रमुखांना निमंत्रणं पाठवलं जाण्याची शक्यता आहे.

    मोदी सोमवारी सायंकाळी 6 वाजता राष्ट्रपती भवनमधील प्रांगणामध्ये शपथ घेणार आहेत. या सोहळ्यासाठी पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, भुतान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या देशांना ही निमंत्रणं पाठवली जाणार आहेत. नरेंद्र मोदींच्या या देशांचे राष्ट्रप्रमुख शपथविधी समारंभाला उपस्थित राहिले तर मोदी सरकारसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर ती एक मोठी जमेची बाजु ठरणार आहे.

    दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ शपथविधी सोहळ्याला हजर राहण्याची शक्यता नाही. पाकिस्तानला यासंदर्भात विचार करण्यासाठी अधिक वेळ हवा आहे अशी माहिती मिळाली आहे.

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    [if0] [sc0]

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    First published:

    Tags: Election, Narendra modi, NDA, Pm modi, PM narendra modi, नरेंद्र मोदी, पंतप्रधानपद, भाजप, राष्ट्रपती