Home /News /news /

मोदींचं गुजरात दंगलीतल्या पीडितांकडे दुर्लक्ष

मोदींचं गुजरात दंगलीतल्या पीडितांकडे दुर्लक्ष

Image modi_2nd_day.jpgfghgf_300x255.jpg02 नोव्हेंबर : नरेंद्र मोदींनी सध्या प्रचाराचा जोरदार धडाका लावलाय. आज त्यांनी पाटणा साखळी स्फोटातल्या पीडितांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं पण मोदींच्या गुजरातमध्ये दंगलग्रस्तांच्या वस्तीत काय परिस्थिती आहे.याबद्दलचा हा एक रिपोर्ट...

गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे दावेदार नरेंद्र मोदी पाटणा स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांची भेट घ्यायला गेले होते. पण 2002 च्या गुजरात दंगलग्रस्तांना ते अजूनही का भेटले नाहीत, असा सवाल या दंगलग्रस्तांनी केलाय.

45 वर्षांच्या नूर बानो सय्यद आणि त्यांचं कुटुंब 2002 च्या नरोडा पाटिया हत्याकांडात कसंबसं वाचलं. तेव्हापासून ते एका स्वयंसेवी संस्थेनं उभारलेल्या सिटीझननगर या पुनर्वसन केंद्रात राहत आहे. गेल्या दहा वर्षांत एकदाही नरेंद्र मोदी या वस्तीत फिरकलेले नाहीत. त्यामुळे आपण गुजरातचे रहिवासी आहोत की नाही, असा प्रश्न नूर बानोंना पडलाय. गेल्या 12 वर्षांत ते एकदाही आम्हाला भेटायला आलेले नाहीत. आम्ही गुजरातचे नागरीक नाहीत का? मोदी आम्हाला भेटायला कधीच आले नाहीत. त्यांनी आमची कधीही विचारपूस केली नाही. आम्हाला जी घरं दिलीयत..ती मुस्लीम कमिटीनं दिली अशी व्यथा येथील दंगल पीडितांनी मांडली.

निवडणुकीच्या प्रचारात मोदी नेहमीच गुजरातचं मॉडेल आणि सर्वंकष विकासाबद्दल बोलत असतात. पण हे पुनर्वसन केंद्र मात्र वेगळीच गोष्ट सांगतं. हे सिटीझननगर अहमदाबादच्या सगळ्यात मोठ्या कचरा डेपोच्या मागे आहे.

शहाजहाँ बानो शेख सांगते, "परिस्थिती अगदी बिकट आहे. रस्ते नाहीत, गटार नाही, शाळा नाही. मुलांना शाळेत जाण्यासाठी 6 किलोमीटर चालत जावं लागतं. आणि बाकीची मुलं तर शाळेतच जात नाही."

इथं सगळीकडे धूळ आणि घाणीचं साम्राज्य आहे आणि इथल्या रहिवाशांना मूलभूत सोयीही मिळाल्या नाहीयेत. याकडे मात्र नरेंद्र मोदींचं लक्ष नाहीये.

First published:

Tags: BJP, Narendra modi, Patna, नरेंद्र मोदी

पुढील बातम्या