मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /मुख्यमंत्र्यांच्या होम मिनिस्टरच घालतायेत भोंदूगिरीला खतपाणी?

मुख्यमंत्र्यांच्या होम मिनिस्टरच घालतायेत भोंदूगिरीला खतपाणी?

  amruta12

  पुणे – 08 फेब्रुवारी : अमृता फडणवीस यांच्या समोरच ब्रह्माऋषी गुरुवानंद स्वामी हे आपल्या हाताच्या पंज्यातून मण्याची माळ प्रकट होत असल्याचं उपस्थितांना दाखवीत होतं. तसंच, ती माळ आशीर्वाद आणि प्रसाद म्हणून देण्यात येत होती. काही पुरस्कार मिळवणार्‍यांनाही माळ हातातून प्रकट करून दिली गेली. ही माळ अमृता फडणवीस यांनीही आशीर्वाद म्हणून घेतली. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रात, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम मिनिस्टरच भोंदूगिरीला खतपाणी घालतायेत का?, असा सवाल उपस्थित होत आहे.

  राज्यात अंधश्रद्धा प्रतिबंधक कायदा लागू आहे. त्यामुळे एका सामूहिक कार्यक्रमात गुरुवानंद स्वामी यांनी हाताच्या पंज्यातून मण्याची माळ प्रकट करणे आणि ते ही मुख्यमंत्र्यांच्या पत्नीसमोर हे कितपत योग्य आहे, असं उपस्थितांचं म्हणणं होतं.

  एखादी घटना घडल्यावर त्याला विरोध म्हणून पुरस्कार परत करणं, ही गोष्ट योग्य नाही. पुरस्कार परत करणं म्हणजे ज्यांनी तो पुरस्कार दिला आहे, त्यांचा अपमान करण्यासारखे आहे, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केलं. महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे गरजेचं असून, त्यासाठी त्यांनी प्रयत्नशील असले पाहिजे, असं ही त्यांनी सांगितलं.

  फडणवीस यांना पुण्यात एका कार्यक्रमात ब्रह्माऋषी गुरुवानंद स्वामी यांच्या हस्ते, सूर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी त्या म्हणाल्या, पुरस्कार हे त्या व्यक्तीने त्याच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जातात. त्यामुळे ते परत करणं म्हणजे प्रसादाला परत करण्यासारखे आहे. प्रसाद हा आपण कधीच परत करीत नसतो, असं त्या म्हणाल्या.

  अमृता फडणवीसांचं स्पष्टीकरण:

  माझं भाषण झाल्यावर मला स्वामीजींनी बोलवलं. मी आशीर्वाद घेण्यासाठी गेले. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. मग त्यांच्या हातात असलेली साखळी त्यांनी माझ्या हातावर ठेवली. त्यांच्या हातात आधीपासूनच साधी खड्यांची माळ होती, असं स्पष्टीकरण अमृता फडणवीस यांनी दिलं आहे. स्वामीजी माझ्या आजोबांच्या वयाचे आहेत. आणि कुणीही मला आशीर्वाद देण्यासाठी बोलवलं तर मी जाते. हा माझ्या संस्कारांचा भाग आहे, असंही त्या म्हणाल्या.

  कोण आहेत ब्रम्हर्षी गुरूवानंद स्वामी ?

  - 12 जानेवारी 1941 मध्ये दिल्लीत जन्म

  - आंध्रप्रदेशातल्या तिरूपती इथं आश्रम

  - आय.आय.टी.खरगपूरमधून B.Tech (Elec.)

  - ज्योतिषशास्त्रात पीएचडी

  - वेद आणि इतर धर्मग्रंस्थांचा अभ्यास

  - स्वामींकडे दिव्य आध्यात्मिक शक्ती असल्याचा दावा त्यांच्या वेबसाईटवर करण्यात आलाय

  - देवराहबाबा यांचे ते शिष्य असल्याचा दावा

  - देश विदेशात योग आणि कुंडलीणी शिकवण्यासाठी भ्रमण


  बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

  Follow @ibnlokmattv


  First published:

  Tags: Devendra Fadnavis, Pune