Home /News /news /

मुख्यमंत्र्यांपाठोपाठ उपमुख्यमंत्र्यांचाही पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर बहिष्कार

मुख्यमंत्र्यांपाठोपाठ उपमुख्यमंत्र्यांचाही पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर बहिष्कार

ajit pawar and modi 21  ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वेगवेगळ्या विकास कामांच्या भूमिपूजनासाठी नागपुरात येणार आहेत. पण, पंतप्रधानांसोबतच्या या कार्यक्रमांवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी बहिष्कार टाकला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे राज्यसभेतले खासदार, राज्यातले आमदार इतकंच नाही तर नगरसेवकही या कार्यक्रमांना जाणार नाहीयेत. फक्त सरकारचे प्रतिनिधी म्हणून सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विमानतळावर स्वागत करणार आहेत. पण ते कार्यक्रमाला हजेरी लावणार नाहीत. शिष्टाचार म्हणून ते पंतप्रधानांचं स्वागत करतील. शिवाजीराव मोघे हे नागपूरचे पालकमंत्री आहेत. पंतप्रधान मोदी आज महत्त्वाकांक्षी अशा नागपूर मेट्रोचं भूमिपूजन करणार आहेत. हा कार्यक्रम केंद्र सरकार, राज्य सरकार, नागपूर महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास यांच्या सहभागाने आयोजित करण्यात आला आहे. कस्तुरचंद पार्कवर होणार्‍या या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी भाषण करणार आहेत. या प्रकल्पाला दीड ते पावणे दोन लाख लोक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा सरकारी कार्यक्रम असला तरी याला भाजपच्या प्रचार सभेचं स्वरूप आलं आहे. मोदी नागपूर मेट्रो, पारडी आणि मानकापूर उड्डाणपुलांचं भूमिपूजन करणार आहेत. तर मौदामधल्या NTPCच्या प्रकल्पांचं लोकार्पण करणार आहे. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Narendra modi, नरेंद्र मोदी, नागपूर, नागपूर मेट्रो, पंतप्रधान, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र, माणिकराव ठाकरे, मुख्यमंत्री

पुढील बातम्या