मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

मुख्यमंत्र्यांनी घोषणा करूनही दुष्काळी भागात वसुली होतेच कशी ? - गुलाबराव पाटील

मुख्यमंत्र्यांनी घोषणा करूनही दुष्काळी भागात वसुली होतेच कशी ? - गुलाबराव पाटील

sadsadasdaady

मुंबई -22 मार्च : मुख्यमंत्र्यांनी घोषणा करूनही दुष्काळी भागातली वसुली अजूनही का थांबवली नाही?, असा जाब सावाल आमदार गुलाबराव पाटील यांनी राज्य सरकारला विचारला आहे. शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्पावर तडाखेबंद भाषण करत राज्य सरकारला घरचा अहेर दिला आहे.

आम्ही सरकारमध्ये सामील असलो तरी सरकारजमा झालो नाही असंही पाटील म्हणाले. तसंच दुष्काळामुळं सरकारनं वसुली थांबवली अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र घोषणा करूनही दुष्काळग्रस्त भागात अजुनही वसूली सुरूच आहे, असं त्यांनी उदाहरण देऊन सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यावरही अधिकार्‍यांची हिंमत होतेच कशी?, असा सवाल त्यांनी केला. राज्यात 'राजा बोले आणि दल हाले' अशी स्थिती असली पाहिजे, मात्र असं होताना दिसत नाही असं सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांना खडे बोल सुनावले आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


First published:

Tags: BJP, Shivsena, एनडीए, गुलाबराव पाटील, शिवसेनेचा भाजपला टोला

पुढील बातम्या