Home /News /news /

पुणे मेट्रोला हिरवा कंदील, मुंबई मेट्रो-3चंही मंगळवारी भूमिपूजन

पुणे मेट्रोला हिरवा कंदील, मुंबई मेट्रो-3चंही मंगळवारी भूमिपूजन

mumbai metro 322 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकाच्या तोंडावर सत्ताधार्‍यांनी घोषणांचा धडाका लावला आहे. केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी नागपूर मेट्रोच्या भूमिपूजनाच्या वेळी ग्वाही दिल्याप्रमाणे आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पुणे मेट्रोला मान्यता देण्यात आली असल्याची घोषणा केलीय.

त्याचबरोबर येत्या 26 ऑगस्टला मुंबई मेट्रो 3 चं भूमिपूजन होणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. नायडू यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. केंद्र सरकार पुणे आणि नागपूर मेट्रोत भेदभाव करतंय असा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केला होता. त्यावर मेट्रोमध्ये कुठलंही राजकारण नसल्याचं नायडूंनी स्पष्ट केलंय.

आम्हीही यापूर्वी पुणे महापालिकेला पत्र लिहिलंय. राज्य सरकारलाही अनेक पत्रं पाठवली पण प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान 26 ऑगस्टला मेट्रो 3 चं भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांना येण्याची विनंती केलीय, असं नायडू म्हणाले. मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी होत असेल तर लोकांचा राग समजून घ्यावा असा टोलाही नायडू यांनी लगावला.

दरम्यान, या अगोदर व्यंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची आज सह्याद्रीवर बैठक झाली. एमएमआरडीएच्या प्रकल्पांसंदर्भात यावेळी चर्चा झाली. तसंच भाजप-सेनेच्या खासदारांनीही आज नायडू यांची भेट घेतली. मुंबई मेट्रो दोनचा प्रस्ताव त्यांनी नायडूंना दिला. ही मेट्रो अंडरग्राऊंड व्हावी, अशी या खासदारांची मागणी आहे. यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेण्याचं आश्वासन नायडूंनी दिलं होतं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Pune metro, नागपूर मेट्रो, पुणे मेट्रो, पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र, मुख्यमंत्री

पुढील बातम्या