मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

मुंबईत पुन्हा गँगवॉर भडकण्याची भीती, दाऊद-राजनच्या टोळ्या सक्रिय

मुंबईत पुन्हा गँगवॉर भडकण्याची भीती, दाऊद-राजनच्या टोळ्या सक्रिय

dawood vs chota rajanराहुल झोरी, मुंबई

08 जुलै : मायानगरी मुंबईत पुन्हा गँगवॉर भडकण्याची भीती निर्माण झालीये. ऑस्ट्रेलियात छोटा शकीलने छोटा राजनवर हल्ला करण्याचा डाव रचला होता. छोटा राजनने हल्ला चुकवला असला, तरी या घडामोडींची धग मुंबईत जाणवतेय. दाऊद आणि छोटा राजन या दोघांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. त्याची दखल घेत मुंबई पोलिसांनी खबर्‍यांच्या बैठकी घ्यायला सुरुवात केलीये.

दाऊद इब्राहिम  आणि छोटा राजन...पुन्हा एकदा एकमेकांच्या शोधात जगभर जंगजंग पछाडून काढत आहेत. गेल्या आठवड्यात छोटा राजन ऑस्ट्रेलियामध्ये असताना.. तिथे दाऊदचा राइट हँड छोटा शकील पोहोचला. छोटा शकील छोटा राजनला शोध असल्याचं भारतीय गुप्तचर संस्थांना कळलं. राजन जगभरात जिथेकुठे असेल, तिथे त्याला पकडून मारायचा चंग छोटा शकीलने बांधलाय. राजन ऑस्ट्रेलियात वाचला, पण त्यानंतर सुरू झाला. अंडरवर्ल्डचा नवा खेळ.. दोन्ही टोळ्यांच्या मुंबईतल्या स्लीपर सेल्स एकाएकी सक्रिय झाल्या..

मुंबई पोलिसांनी आपल्या सगळ्या खबर्‍यांना कामाला लावलंय. पोलिसांनी सगळ्या खबर्‍यांची एक गुप्त बैठक घेवुन अंडरवर्ल्डच्या प्रत्येक हालचालींवर बारीक नजर ठेवण्याच्या सुचना दिल्या आहेत. छोटा राजनच्या ठावठिकाण्याबद्दल आणि त्याच्या हालचालींबद्दल सगळी माहिती दाऊदला पोहचतेच कशी, या प्रश्नाने राजन चांगलाच बिथरलाय. ही माहिती पुरवणारा आपल्याच टोळीतलाच कुणीतरी आहे, असा संशय छोटा राजनला वाटतोय. त्यामुळे त्याने आपल्या हस्तकांना गद्दाराला शोधून काढायचं फर्मान सोडलंय.

गँगवॉर भडकण्याच्या भीतीमुळे मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये तणावपुर्ण शांतता आहे. छोटा राजन भलेही देशाबाहेर भारतीय गुप्तचर संस्थाना मदत करत असेल, पण मुंबईत मात्र सध्या सूडाने पेटलेले त्याचे गुंड हिंसाचाराचं सावट पुन्हा आणू शकतात. म्हणूनच पोलीस एकदम सतर्क आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Dawood ibrahim, Dawood ibrahim chhota rajan, Mumbai, गँगवॉर, छोटा राजन, छोटा शकील, दाऊद इब्राहिम, मुंबई

पुढील बातम्या