01 ऑगस्ट : पुण्याजवळ आंबेगाव तालुक्यातील माळीण गावातल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या आता 63 झाली आहे. त्यात 25 पुरुष, 28 महिला आणि 10 मुलांचा समावेश आहे. मृतांपैकी 52 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. या घटनेत 174 घरांपैकी 44 घरे दबल्याची प्राथमिक माहिती असून 167 लोक गाडले गेले आहे अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी दिलीय.
माळीण दुर्घटनेमध्ये बचावलेल्यांचं पूर्णपणे पुनर्वसन करण्यात येईल, बचावलेल्या कुटुंबीयांना घरगुती वस्तूपासून ते निवार्याची संपूर्ण व्यवस्था राज्य सरकारकडून करण्यात येईल असंही पतंगराव कदम यांनी जाहीर केलंय. माळीण दुर्घटनेनंतर त्यांनी आज पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. राज्य सरकारतर्फे प्रत्येक कुटुंबाला 5 लाखांची मदत देऊन त्यांच्याशी पूर्ण चर्चा करूनच त्यांच्या पुनर्वसनाचा निर्णय घेण्यात येईल, असंही ते म्हणाले.
एसडीआरएफ स्थापन
तसंच एनडीआरफच्या धर्तीवर एसडीआरएफ स्थापन केलेलं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे, अशी माहितीही त्यांनी दिलीये. एसडीआरएफमध्ये 428 पदं असणार असून केवळ आपत्ती पुनर्वसनासाठी ही तुकडी काम करेल असंही कदम यांनी सांगितलं. त्याचबरोबर विद्यापिठाच्या जीऑलॉजीच्या प्राध्यापकांनी या घटनेबद्दल तपास करायला सांगितलं आहे, पण अजून कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही, असंही कदम यांनी स्पष्ट केलं.
घटनेचा तिसरा दिवस मदतकार्य सुरू
माळीण गावात दुर्घटनाघडून आज तिसरा दिवस उजाडला आहे. मुख्य ढिगारा उपसण्याचं काम अजूनही सुरूच आहे. आणखी दोन दिवस हे काम सुरू राहणार आहे. पण पाऊस, चिखल यामुळे इथे प्रचंड दुर्गंधी पसरलीय. त्यामुळे एनडीआरएफ (NDRF) च्या जवानांना त्रास होतोय. सकाळी थोडा पाऊस होता मात्र आता पाऊस थांबल्यानं जवानांना दिलासा मिळालाय. माळीणमध्ये 174 घरं आहेत. त्यापैकी 44 घरं दबलेली आहेत. त्यात 167 लोक दबले गेल्याची भीती व्यक्त होत आहे. घटनास्थळी 50 ऍम्बुलन्स, 15 जेसीबी मशीनस, 360 एनडीआरफचे जवानकार्य करत आहे. जुन्नर पालिकेची कर्मचारीही मदतकार्यात सहभागी झाले आहे. आणखी दोन दिवसांचा अवधी काम पूर्ण होण्यास लागणार असा अंदाजही कदम यांनी व्यक्त केला.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhimashankar, Malin, NDRF, Patangrao kadam, Pune, Pune landslide