08 सप्टेंबर : राकेश मारिया यांच्या बदलीमागे गुजरात दिल्ली कनेक्शन आहे असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय. पीटर मुखर्जी यांच्या चौकशीतून मनी लाँड्रिंगचा प्रकार समोर येणार होता त्यात भाजप समर्थक उद्योजकांची नाव समोर येणार होती म्हणून मारियांची उचलबांगडी करण्यात आलीये असा गंभीर आरोपही मलिक यांनी केला.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची आज अचानक तडकाफडकी बदली करण्यात आलीये. राकेश मारिया शीना बोरा प्रकरणाची स्वता:हुन चौकशी करत होते. अचानक त्यांच्या बदलीमुळे एकच कल्लोळ उडालाय. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन मारियांच्या बदलीवर प्रकाश टाकलाय. दिल्लीच्या दबावाखाली 22 दिवसांअगोदरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राकेश मारियांच्या बदलीचा निर्णय घेतला होता. तीन दिवसांपूर्वीच शीना बोरा हत्याकांड प्रकरणापेक्षा इतर केस महत्वाच्या आहे असं सांगत मुख्यमंत्र्यांनी मारिया यांना इशारा दिला होता असं मलिक यांनी सांगितलं.
पोलीस कोठडी झाल्यानंतर पीटर मुखर्जी यांची चौकशी सुरू होती. त्यातून हवाला मार्फत पैसा मागवण्याचा प्रकार पुढे येत होता. या मनी लाँड्रिंग प्रकारात भाजप समर्थक उद्योजकांची नाव समोर येणार होती. दिल्ली आणि गुजरातमधील काही व्यापार्यांचे एका मीडिया कंपनीमध्ये पैसे गुंतवले आहे. पीटर मुखर्जी या मीडिया कंपनीचे प्रमुख आहे. पीटर मुखर्जी यांच्या चौकशीतून नावं उघड होऊ नये यासाठी सरकार दबाव टाकला गेला. या केसचा तपास थांबवला पाहिजे म्हणून मारियांची उचलबांगडी करण्यात आली असा आरोप मलिक यांनी केला.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.