मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

मानखुर्द राडा प्रकरणी SIT स्थापन, राहुल शेवाळे अडचणीत

मानखुर्द राडा प्रकरणी SIT स्थापन, राहुल शेवाळे अडचणीत

Image img_216742_senamns34_240x180.jpg25 एप्रिल : मानखुर्दमध्ये महाराष्ट्रनगर भागात मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बुधवारी रात्री राडा झाला होता. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसंच राहुल ढेंगरे आणि मोहम्मद सियाउद्दीन या दोघांना अटक करण्यात आलीय. याच संदर्भात मनसेच्या पदाधिकार्‍यांविरोधातही विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याचप्रकरणी 20 शिवसैनिकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात राहुल शेवाळेंच्या पत्नीचाही समावेश आहे. त्यामुळे राहुल शेवाळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. या राडयाप्रकरणी 6 अधिकार्‍यांची एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. ही टीम नक्की काय घडलं होतं याचा तपास करणार आहे.

'राहुल शेवाळेंवर खुनाचा गुन्हा दाखल करा'

मानखुर्दमध्ये झालेल्या राडाप्रकरणी राहुल शेवाळेंवर खुनाचा गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांना अटक व्हावी अशी मागणी आम आदमी पार्टीने केलीय. आपच्या कार्यकर्त्यांनी कामिनी शेवाळेंना पैसे वाटताना पाहिलं आणि पोलिसांना माहिती दिली असं आपचं म्हणणं आहे. पोलिस घटनास्थळी पोचल्यावर शिवसेनेच्या गुंडांनी पोलिसांवर हल्ला केल्याचं आपचं म्हणणं आहे. हे निवडणूक आचारसंहिता आणि कायद्याचं उल्लंघन असून त्यासाठी जबाबदार असल्याने राहुल शेवाळेंचंही नाव एफआयआरमध्ये दाखल करण्यात यावी अशी मागणी 'आप'ने एका पत्रकाद्वारे केलीय.

काय आहे नेमकं प्रकरण ?

लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या आदल्या रात्री मानखुर्दमध्ये मध्यरात्री मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यामध्ये राडा झाला. मनसे आणि सेनेच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली यात पोलीस कॉन्स्टेबल विकास थोरवाले जखमी झाले. मानखुर्दमध्ये महाराष्ट्रनगरमध्ये ही घटना घडली. मनसेचे पुण्याचे उमेदवार दीपक पायगुडे पैसे वाटप करत होते असा आरोप शिवसेनेनं केला. एवढेच नाही तर मतदारांना पैसे वाटप करत असताना शिवसैनिकांनी मनसे कार्यकर्त्यांची गाडी पकडून दिली. यामुळे सेना आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्ही कार्यकर्त्यांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत विकास थोरवाल जखमी झाले. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. तसंच या दगडफेकीत काही गाड्यांचंही नुकसान झालंय. या प्रकरणी 16 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आयपीसी कलम 307, 332, 143, 147, 149 आणि कलम 114 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

[if0] [sc0]

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: MNS, Mumbai, Police, Rahul shewale, Shiv sena, मनसे, राहुल शेवाळे, शिवसेना