मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

माजी सहकार मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांचं निधन

माजी सहकार मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांचं निधन

pratapsingh mohite patil06 जुलै : राज्याचे माजी सहकार मंत्री आणि माजी खासदार प्रतापसिंह मोहिते पाटील यांचं मुंबईत दिर्घ आजारपणामुळे निधन झालं. ते 59 वर्षांचे होते. त्यांच्यावर लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या निधनामुळं अकलूजमध्ये शोककळा पसरलीये.

प्रतापसिंह मोहिते पाटील 1997 -99 च्या दरम्यान युती सरकारच्या काळात सहकार राज्यमंत्री होते. 2003 साली भाजपकडून खासदार बनले. तर 2004 साली काँग्रेसकडून विधान परिषदेवरून आमदार म्हणून त्यांची निवड झाली होती. करारी नेतृत्त्व अशी त्यांची ओळख होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सख्खे बंधु विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात त्यांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती.

प्रतापसिंह मोहिते-पाटील यांची कारकिर्द  - 1992-97 जिल्हा परिषद अध्यक्ष असताना सोलापूर झेड पी . राज्यात नंबर 2 ची झेडपी होती. - 1997-99 दरम्यान युती सरकारच्या काळात सहकार राज्यमंत्री. - 2003 साली भाजपकडून खासदार बनले. - काँग्रेसकडून 2004 साली विधान परिषदेवरून आमदार - 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सख्खे बंधु विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढले

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: माढा, विजयसिंह मोहिते पाटील, सोलापूर

पुढील बातम्या