मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

महाराष्ट्रासह देशभरात अतिरेकी हल्ल्याचं सावट,हायअलर्ट जारी

महाराष्ट्रासह देशभरात अतिरेकी हल्ल्याचं सावट,हायअलर्ट जारी

terrorist208 डिसेंबर : मध्य प्रदेशच्या कारागृहातून मागील वर्षी फरार झालेले पाच अतिरेकी देशविघातक कृत्य करण्याची तयारी असल्याची खळबळजनक माहिती हाती लागली आहे. हे पाचही अतिरेकी पाकिस्तानच्या आयएसआय या दहशतवादी संघटनेशी जोडलेले आहे. हे अतिरेकी देशभरात हल्ले करतील अशी माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे. त्यामुळे देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आलाय.

वेगवेगवेळ्या प्रकरणात संशयित म्हणून या पाच अतिरेक्यांना मागिल वर्षी अटक करण्यात आली होती. त्यांना मध्यप्रदेश खंडवा कारागृहात डांबण्यात आलं होतं. मात्र हे चारही अतिरेकी ऑक्टोबर 2013 मध्ये कारागृहातून पळाले होते. वर्षभरापासून या अतिरेक्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू होता मात्र अद्याप पाचही अतिरेकी हाती लागले नाही. आता हे पाचही अतिरेकी पाकिस्तानच्या आयएसआय या दहशतवादी संघटनेशी संपर्कात आले आहे. देशभरात आयएसआयच्या सांगण्यावरून हे अतिरेकी कुठेही घातपात घडवून आणू शकतात अशी माहिती भारतीय गुप्तचर विभागाने दिलीये. महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान ही राज्य या अतिरेक्यांच्या रडारवर असून या अतिरेक्याचं माहीत असलेलं शेवटचं ठिकाण कर्नाटक आहे असं सांगण्यात आलंय. त्यामुळे देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आलाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

[if0] Follow @ibnlokmattv[sc0]

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Pakistan, Terror attack, अतिरेकी, कारागृह, पाकिस्तान, मध्य प्रदेश