मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

महायुतीच्या सभेआधी, माढाचा तिढा सुटणार का?

महायुतीच्या सभेआधी, माढाचा तिढा सुटणार का?

mahayuti on stage.traer16 फेब्रुवारी :  महायुतीची आज संध्याकाळी बीडमध्ये सभा होणार आहे. त्यापूर्वी माढाच्या जागेवर लोकसभा निवडणूक कोण लढवणार यावरही महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेन माढा मतदार संघावर आधीच दावा केला होता. पण राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी माढाच्या जागेवर हक्क सांगितला आहे. इतकंच नाही, तर ही जागा आपल्याला दिली तरंच आपण महायुतीत राहू असा इशारा त्यांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये महायुतीचे नेते माढाच्या जागेवर चर्चा करणार आहेत. या बैठकीला महादेव जानकरही उपस्थित राहणार आहेत.

तर दुसरीकडे, माढ्याच्या जागेसाठी आग्रही असणारे महादेव जानकर महायुती सोडून जाणार नाहीत असा विश्वास भाजपचे नेते विनोद तावडे यांनी व्यक्त केला आहे. जानकरांच्या जागेचा प्रश्न आज बीडमधल्या महायुतीच्या सभेदरम्यान सुटेल असाही दावा तावडेेंनी केला आहे. जानकरांना कुठली जागा द्यायची चे महायुतीचे नेते ठरवतील, असं ते म्हणाले.

दरम्यान माढयाची जागा आरपीआयला द्या अशी नवी मागणी रामदास आठवलेंनी केली आहे. प्रताप सिंग मोहिते यांच्यासाठी ही जागा आम्हाला पाहिजे असं आठवलेंचं म्हणणं आहे.

First published:

Tags: Election 2014, Pawar, Raju shetty, पवार, महायुती, माढा लोकसभा, रामदास आठवले

पुढील बातम्या