मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

मशिदीमध्ये श्रीगणेशाची प्रतिष्ठापना

मशिदीमध्ये श्रीगणेशाची प्रतिष्ठापना

संदीप राजगोळकर, कोल्हापूर24 सप्टेंबरकोल्हापूर जिल्ह्यातल्या कुरुंदवाडमध्ये आजही मुस्लीम समाजाच्या मशिदीमध्ये श्रीगणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. तब्बल 30 वर्षांपासून सुरु असेलली ही परंपरा आजही तिथल्या मंडळांनी कायम ठेवली आहे. हा गणपती आहे कुरुंदवाडच्या सन्मित्र गणेशोत्सव मंडळाचा...या गणपतीचं वैशिष्ट्य असं की, हा गणपती विराजमान झालाय तो एका मशीदीमध्ये..जवळपास 20 हजार लोकसंख्येचं हे शहर..इथं गेल्या 3 तपांपासून मशिदींमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते. त्यामुळे हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही धर्मीय नागरिक भक्तीभावानं, ऐक्यानं गणेशोत्सव साजरा करता. शहरातल्या कारखाना, गोधड, शेळके, ढेपणपूर, आणि कुडजेखान मशिदींमध्ये आजही गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते.इथल्या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य असं की हे भिन्न धर्मीय बांधव हा उत्सव साजरा करत असले तरी आजपर्यंत पोलिसांचं संरक्षण घेण्याची गरज लागलेली नाही. त्यामुळे दोन्ही समाजातला एकोपा दृढ होत आहे. दोन्ही धर्माच्या संस्कृती जोपासताना अनेक सांस्कृतिक कार्यक्रम इथे आयोजित केले जातात. त्यामध्ये हिंदू आणि मुस्लीम धर्मीयांचा समावेश असतो. मग ते शिवाजी महाराजांचं नाटक असो वा मुस्लीम धर्मीयांचा मोहरम असो... राष्ट्रीय एकात्मता जपण्यासाठी पक्षांकडून आवाहनं केली जातात, मात्र त्यातूनही विविधतेतून सामाजिक समता जपणार्‍या कुरुंदवाडच्या नागरिकांचा हा एकोपा म्हणूनच वाखाणण्यासारखा आहे.

पुढे वाचा ...

संदीप राजगोळकर, कोल्हापूर

24 सप्टेंबर

कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुरुंदवाडमध्ये आजही मुस्लीम समाजाच्या मशिदीमध्ये श्रीगणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. तब्बल 30 वर्षांपासून सुरु असेलली ही परंपरा आजही तिथल्या मंडळांनी कायम ठेवली आहे.

हा गणपती आहे कुरुंदवाडच्या सन्मित्र गणेशोत्सव मंडळाचा...या गणपतीचं वैशिष्ट्य असं की, हा गणपती विराजमान झालाय तो एका मशीदीमध्ये..जवळपास 20 हजार लोकसंख्येचं हे शहर..इथं गेल्या 3 तपांपासून मशिदींमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते. त्यामुळे हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही धर्मीय नागरिक भक्तीभावानं, ऐक्यानं गणेशोत्सव साजरा करता. शहरातल्या कारखाना, गोधड, शेळके, ढेपणपूर, आणि कुडजेखान मशिदींमध्ये आजही गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते.

इथल्या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य असं की हे भिन्न धर्मीय बांधव हा उत्सव साजरा करत असले तरी आजपर्यंत पोलिसांचं संरक्षण घेण्याची गरज लागलेली नाही. त्यामुळे दोन्ही समाजातला एकोपा दृढ होत आहे. दोन्ही धर्माच्या संस्कृती जोपासताना अनेक सांस्कृतिक कार्यक्रम इथे आयोजित केले जातात. त्यामध्ये हिंदू आणि मुस्लीम धर्मीयांचा समावेश असतो. मग ते शिवाजी महाराजांचं नाटक असो वा मुस्लीम धर्मीयांचा मोहरम असो...

राष्ट्रीय एकात्मता जपण्यासाठी पक्षांकडून आवाहनं केली जातात, मात्र त्यातूनही विविधतेतून सामाजिक समता जपणार्‍या कुरुंदवाडच्या नागरिकांचा हा एकोपा म्हणूनच वाखाणण्यासारखा आहे.

First published: