मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

मलाही संघर्ष करायचा नाही -राज ठाकरे

मलाही संघर्ष करायचा नाही -राज ठाकरे

04 मार्चराज ठाकरेंना पुण्यात पाय ठेवू देणार नाही राष्ट्रवादीचे नेते अकुंश काकडे यांच्या आव्हानाला सडेतोड उत्तर देत मी 7 तारखेला पुण्यात येणार आहे, हिंमत असेल तर अडवून दाखवाच असं प्रतिआव्हान देणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता मवाळ भूमिका घेतली आहे. पुण्यात माझा कोणताही कार्यक्रम नाही. मी फक्त माझ्या मित्रांना भेटायला जाणार होतो.त्यामुळे आम्ही जिंकलो असं काही नाही. मला कोणताही संघर्ष करायचा नाही. मी फक्त त्यांनी आव्हान दिलं होतं म्हणून मीही प्रतिआव्हान दिलं होतं. मी माझी भाषणं करतोय. त्यांनी टीकेला उत्तर द्यावी असं स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी दिलं. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी-मनसे वादावर पडदा टाकला आहे.गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी विरूद्ध मनसे असा संघर्ष पेटला होता. मात्र आता हा संघर्ष मावळल्याची चिन्ह आहे. जालन्यात झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर तोफ डागली होती. अकुंश काकडे म्हणे पुण्यात पाय ठेवून देणार नाही. आज 2 तारीख आहे मी 7 तारखेला पुण्यात येणार आहे. हिंमत असेल तर अडवून दाखवाच असं आव्हान राज यांनी दिलं होतं. यासभेत राज यांनी शरद पवारांनाही थेट सवाल विचाराला होता. हा दुष्काळ सरकार निर्मित आहे की निसर्गनिर्मित ? याचे उत्तर पवारसाहेबांनी द्यावे अशी विनंतीही राज यांनी केली होती. तर अजित पवारांनी केलेल्या टीकेवर उत्तर द्यावे. सिंचनावर 70 हजार कोटी खर्च केले आहे तर काम काय केलं आहे ? याचे उत्तर द्यावे असा टोला लगावला होता. राज यांच्या सभेनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांसह, कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं होतं. राज्यात दुष्काळ परिस्थिती असतांना वाद नको जरा सबुरीने घ्या असं आवाहन दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनं केलं होतं. पवारांच्या आवाहनानंतर अकुंश काकडेंनी आपलं आव्हान मागे घेतलं होतं. आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी मला आव्हान दिलं होतं की पुण्यात पाय ठेवू देणार नाही. आता ते म्हणाले पाय ठेवू देणार नाही तर मी 5 दिवसांअगोदर त्यांना सांगितलं 7 तारखेला पुण्यात येणार आहे हिंमत असेल तर अडवून दाखवा. पण माझी पुण्यात कोणतीही सभा नाही. एकीकडे राज्यात दुष्काळ पडला, मुलांच्या परीक्षा आहे. त्यामुळे मलाही संघर्ष नको. पुण्यात माझे काही मित्र आहे त्यांच्यासोबत आम्ही वैशालीत डोसा खाणार असा आमचा बेत आखला आहे. पण अनेकांना असा गैरसमज झाला की माझी पुण्यात सभा असेल. पण असं काही नाही. फक्त त्यांनी आव्हान दिलं होतं म्हणून मीही प्रतिआव्हान दिलं असं स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी दिलं. तसंच शरद पवार यांच्याविरोधात माझा कोणताही संघर्ष नाही. मी त्यांच्यावर या सर्व सभेत कधी टीकाही केली नाही. त्यांच्याबद्दल मला आदर आहे. पण त्यांनी माझ्या प्रश्नांची उत्तर द्यावीत एवढीच माझी अपेक्षा आहे. असं मतही राज ठाकरे यांनी व्यक्त केलं

पुढे वाचा ...

04 मार्च

राज ठाकरेंना पुण्यात पाय ठेवू देणार नाही राष्ट्रवादीचे नेते अकुंश काकडे यांच्या आव्हानाला सडेतोड उत्तर देत मी 7 तारखेला पुण्यात येणार आहे, हिंमत असेल तर अडवून दाखवाच असं प्रतिआव्हान देणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता मवाळ भूमिका घेतली आहे. पुण्यात माझा कोणताही कार्यक्रम नाही. मी फक्त माझ्या मित्रांना भेटायला जाणार होतो.त्यामुळे आम्ही जिंकलो असं काही नाही. मला कोणताही संघर्ष करायचा नाही. मी फक्त त्यांनी आव्हान दिलं होतं म्हणून मीही प्रतिआव्हान दिलं होतं. मी माझी भाषणं करतोय. त्यांनी टीकेला उत्तर द्यावी असं स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी दिलं. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी-मनसे वादावर पडदा टाकला आहे.गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी विरूद्ध मनसे असा संघर्ष पेटला होता. मात्र आता हा संघर्ष मावळल्याची चिन्ह आहे. जालन्यात झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर तोफ डागली होती. अकुंश काकडे म्हणे पुण्यात पाय ठेवून देणार नाही. आज 2 तारीख आहे मी 7 तारखेला पुण्यात येणार आहे. हिंमत असेल तर अडवून दाखवाच असं आव्हान राज यांनी दिलं होतं. यासभेत राज यांनी शरद पवारांनाही थेट सवाल विचाराला होता. हा दुष्काळ सरकार निर्मित आहे की निसर्गनिर्मित ? याचे उत्तर पवारसाहेबांनी द्यावे अशी विनंतीही राज यांनी केली होती. तर अजित पवारांनी केलेल्या टीकेवर उत्तर द्यावे. सिंचनावर 70 हजार कोटी खर्च केले आहे तर काम काय केलं आहे ? याचे उत्तर द्यावे असा टोला लगावला होता. राज यांच्या सभेनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांसह, कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं होतं. राज्यात दुष्काळ परिस्थिती असतांना वाद नको जरा सबुरीने घ्या असं आवाहन दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनं केलं होतं. पवारांच्या आवाहनानंतर अकुंश काकडेंनी आपलं आव्हान मागे घेतलं होतं. आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी मला आव्हान दिलं होतं की पुण्यात पाय ठेवू देणार नाही. आता ते म्हणाले पाय ठेवू देणार नाही तर मी 5 दिवसांअगोदर त्यांना सांगितलं 7 तारखेला पुण्यात येणार आहे हिंमत असेल तर अडवून दाखवा. पण माझी पुण्यात कोणतीही सभा नाही. एकीकडे राज्यात दुष्काळ पडला, मुलांच्या परीक्षा आहे. त्यामुळे मलाही संघर्ष नको. पुण्यात माझे काही मित्र आहे त्यांच्यासोबत आम्ही वैशालीत डोसा खाणार असा आमचा बेत आखला आहे. पण अनेकांना असा गैरसमज झाला की माझी पुण्यात सभा असेल. पण असं काही नाही. फक्त त्यांनी आव्हान दिलं होतं म्हणून मीही प्रतिआव्हान दिलं असं स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी दिलं. तसंच शरद पवार यांच्याविरोधात माझा कोणताही संघर्ष नाही. मी त्यांच्यावर या सर्व सभेत कधी टीकाही केली नाही. त्यांच्याबद्दल मला आदर आहे. पण त्यांनी माझ्या प्रश्नांची उत्तर द्यावीत एवढीच माझी अपेक्षा आहे. असं मतही राज ठाकरे यांनी व्यक्त केलं

First published: